(व्हिडीओ यू ट्यूब वर ही उपलब्ध आहे )
पुणे- आज (रविवारी) पुण्यात डेक्कन येथील गरवारे पुलावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अतिभव्य अशा मराठा मूक मोर्चास प्रारंभ झाला. गर्दीच्या महासागरास उधाण आले होते . जणू पुण्यात आज सकाळी दुपारपर्यंत भगवी लाटच अवतरली होती .मोर्चातील तरुणींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली .
प्रारंभी काश्मीरमधील उरी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर तरुणींच्या हस्ते संभाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून मूक मोर्चास प्रारंभ झाला. हा मोर्चा टिळक चौक मार्गे लक्ष्मी रस्ता, सिटी पोस्ट, संत कबीर चौक, नाना पेठ क्वार्टर गेट, हॉटेल शांताईमार्गे, लाल देऊळ, नवीन जिल्हा परिषद कार्यालयासमोरून हॉटेल ब्लू नाइल मार्गे विधान भवन चौकात नेण्यात आला .
मोर्चासाठी पहाटे पाचपासून डेक्कन परिसर आणि जंगली महाराज रस्त्यावर मोठ्या संख्येने सकाळी ९ वाजेपर्यंत नागरिक सहभागी झाले होते . तरुणापासून वयोवृद्धपर्यंत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. नियोजन बद्ध मोर्चाचे आयोजन गेले आहे. हातात झेंडे घेऊन नागरिक सहभागी झाले . मोर्चात सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणाहून लोकं आले .
यामध्ये विविध राजकीय पक्षांचे आणि संघटनांचे नेते सहभागी झाले. . मोर्चाच्या अलका चौकात सुनेत्रा पवार आणि माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी विरोधी पक्षनेता दत्ता सागरे यांनी मिडियाचे लक्ष वेधून घेतले . धावपटू ललिता बाबर, उदयनराजे भोसले मोर्चात सहभागी झाले . मोर्चास प्रारंभ होण्यापूर्वी ललिता बाबर आणि उदयनराजे भोसले यांनी मोर्चात आपली मते वाहिन्यांच्या कॅमेरयापुढे व्यक्त केली.अजित पवार यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता मोर्चात सहभागी होणे पसंद केले खासदार उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबरच स्थानिक नेते, नगरसेवकही मोर्च्यात सहभागी झाले होते. त्यात सर्वच प्रमुख पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. महापौर प्रशांत जगताप,माजी गृहराज्यमंत्री ,शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे कॉंग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम,अजित दरेकर ,राजलक्ष्मी भोसले . शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण, चंद्रकांत मोकाटे आदीही मोर्च्यात आले होते. माजी खासदार अशोक मोहोळ, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी अंकुश काकडे, चेतन तुपे, विकास दांगट आदींचाही त्यात समावेश होता.