पुणे-मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात येत असलेले आंदोलन हे स्टंट आहे, असे वक्तव्य पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवारी पुण्यातील अलका चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दुचाकीवर ‘स्टंट’ करत निषेध नोंदवला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मागील दोन वर्षांपासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मागील आठवड्यापासून खासदार आणि आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. त्याच दरम्यान भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी हे आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ पुण्यात मेधा कुलकर्णी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करीत निषेध नोंदवला होता. तर आज देखील अलका चौकात दुचाकीवर धाडसी प्रात्यक्षिके दाखवत निषेध नोंदवला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
दरम्यान, उद्या (दि. ९ ऑगस्ट) रोजी राज्यभरात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा फटका विद्यार्थी वर्गाला बसू नये, यासाठी पुण्यातील शाळा, महाविद्यालय एक दिवसासाठी बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जाहीर केला आहे.
दरम्यान,उद्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पीएमपीने सावध भूमिका घेतली असून शहरातील विविध भागातून चाकणकडे जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्यात येणार अाहेत. त्याचबराेबर इतर मार्गांमध्येही बदल करण्यात अाले अाहेत. पीएमपीकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात अाली अाहे. यात पाेलीसांकडून शहर व हद्दीलगतच्या परिसरामध्ये तीव्र अांदाेलणाची शक्यता वर्तवल्यामुळे पीएमपीच्या मार्गांचे संचलनात बदल केल्याचे सांगण्यात अाले अाहे. पीएमपीने दिलेल्या माहितीनुसार पुणे नाशिक रस्त्यावरील सर्व बसमार्ग बंद ठेवण्यात येणार अाहेत. पुणे मुंबई रस्त्यावर निगडीच्या पुढे देहूगांव, वडगांव, कामशेत व किवळेकडे जाणारे सर्व बसमार्ग बंद असणार अाहेत. पाैड राेडवरील बसेस या फक्त चांदणी चाैकापर्यंतच धावणार अाहेत. सिंहगड रस्त्यावर वडगांव धायरी पर्यंतच बसेस सुरु असणार अाहेत. मांडवी बहूली राेडने संचलनात असणारे बसमार्ग वारजे माळवाडी पर्यंतच सुरु असणार अाहेत. पुणे सातारा रस्त्यावर कात्रज पर्यंतच बसेस धावणार अाहेत. बाेपदेव घाट मार्गे जाणारे सर्व मार्गावरील बससेवा येवलेवाडी पर्यंत सुरु असणार अाहे. हडपसर रस्त्यावरुन जाणारे सर्व बसमार्ग फुरसुंगी पर्यंतच सुरु असतील. तर साेलापूर रस्त्याने जाणारे सर्व बसमार्ग हे शेवाळवाडी अागारापर्यंतच सुरु असतील. नगरराेडवरुन धावणाऱ्या बसेस या वाघाेली पर्यंतच असणार अाहेत. काेलवडी, साष्टे मार्गे जाणारा बसमार्ग बंद ठेवण्यात येणार अाहे. मरकळ हा बसमार्गही बंद असणार अाहे. तर निगडी ते चाकण अाणि वडगाव, चाकण रस्त्यावरील सर्व बसमार्ग बंद असणार अाहेत.