महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव व कराड या तालुक्यांमधील गावांसाठी ट्रॅक्टर व शेती उपकरणे यांसाठी हायरिंग सेंटर्स स्थापन
महाराष्ट्रात सर्वत्र 16 हायरिंग सेंटर्स स्थापन करणार
पुणे: 17.8 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रांच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने आज, महाराष्ट्र राज्यामध्ये ट्रिंगो दाखल केल्याची घोषणा केली असून, राज्यात पहिल्या दोन केंद्रांचे उद्घाटन केल्याचेही
जाहीर केले आहे. ट्रिंगो हे खास, अशा प्रकारे पहिलेवहिले फिजिकल डिजिटल मॉडेल असून, त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करण्याची आवश्यकता न भासता, शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी ट्रॅक्टर व अन्य शेती उपकरणे भाड्याने घेता येतील.
नव्या दाखल केलेली केंद्रे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव व कराड या तालुक्यांमध्ये असणार आहेत. महाराष्ट्रात कार्य सुरू केल्याबद्दल ट्रिंगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कुमार यांनी सांगितले, “पश्चिम महाराष्ट्रामध्ये ट्रिंगोची नवी दोन कस्टम हायरिंग सेंटर सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेत उपकरणांद्वारे सबल
करून व त्यामुळे उत्पादकता वाढवून व खर्च कमी करून, ग्रामीण भागाच्या भरभराटीला चालना देण्यासाठी ही ट्रिंगो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कराडमध्ये कस्टम हायरिंग सेंटर दाखल केल्यामुळे आम्ही थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकणार आहोत आणि मालमत्तेमध्ये गुंतवणूक करावी न लागता त्यांना प्रति वापरानुसार पैसे देण्याच्या तत्त्वावर यांत्रिकीकरण तंत्रज्ञान अवलंबणे
शक्य करणार आहोत. तसेच, आम्ही ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करू आणि शेतकऱ्यांना विविध प्रकारचे ट्रॅक्टर उपलब्ध करून, गरज व उपलब्धता यातील तफावत भरून काढण्यासाठी मदत करू.”
त्यांनी पुढे सांगितले, “कराड व कोरेगाव तालुक्यांतील गावांमध्ये लहान व किरकोळ शेतकऱ्यांची संख्या अधिक असून, त्यामुळेयांत्रिकीकरणाचे प्रमाण कमी आहे व शेतीची उत्पादकताही कमी आहे. या भागात ट्रिंगो दाखल केल्यामुळे या आव्हानांवर मात करण्यासाठी मदत होणार आहे. आमच्यासाठी महाराष्ट्र ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि भविष्यात अशीच केंद्रे गुजरात, मध्य प्रदेश व राजसथान येथेही स्थापन करून कार्याचा विस्तार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कर्नाटक येथे आम्ही अगोदरच कार्यरत आहोत.”
ट्रिंगो हे नाव “अब ट्रॅक्टर कॉल करो”- ‘1860 266266 8’ येथे केलेला कॉल (टोल-फ्री क्रमांक) शेतकऱ्यांना ट्रिंगो कॉल सेंटरशी जोडून देतो. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्यांना जवळच् उपलब्ध ट्रॅक्टर व उपकरणांमार्फत योग्य ती सेवा पुरवली जाते. ट्रिंगोमुळे भारतातील शेतकऱ्यांना आता, जुन्या पद्धतीच्या तुलनेत ट्रॅक्टर मागवण्यासाठी सबल केले जाईल. जुन्या पद्धतीत, असंघटित बाजारातून ट्रॅक्टर मागवत असताना शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागे. ट्रिंगच्या ब्रँडचे ब्रिद ‘घर बैठे ट्रॅक्टर मंगवान आप का हक है’ हे असून, यामुळे शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणाचा अधिकार बजावला जाईल.
ट्रिंगोमुळे फ्रेंचाइजीवर आधारित विशेष बिझनेस मॉडेल पुरवले जाते. त्यामध्ये व्यावसायिक 5 ट्रॅक्टरमध्ये आणि संबंधित भागांतील
प्रमुख पिकांसाठी साजेशा उपकरणांमध्ये गुंतवणूक करतील आणि कार्यासाठी केंद्र स्थापन करतील. याबरोबरच, शेतकऱ्यांना निवडक महिंद्रा ऑटो व ट्रॅक्टर डीलरशिप आणि सध्याच्या समृद्धी केंद्रांवरील व्यवसाय केंद्रांमार्फत ही सेवा घेता येईल.
महिंद्राविषयी
महिंद्रा ग्रुप उर्जेला चालना मिळेल, ग्रामीण भागात भरभराट होऊ शकेल, शहरी जीवनशैली वाढेल व व्यवसायाची कार्यक्षमता वाढेल, अशा पर्यायांतून लोकांना उदय होण्यासाठी सक्षम करण्यावर भर देते. मुंबईतील १७.८ अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या समूहात १०० देशांत २००,००० हून अधिक कर्मचारी आहेत.
आर्थिक वाढीसाठी चालना देत असलेल्या महत्त्वाच्या क्षेत्रांत महिंद्रा कार्यरत असून त्याने ट्रॅक्टर, युटिलिटी व्हेइकल, इन्फर्मेशन टेक्नालॉजी व व्हेकेशन ओनरशिप याम्ध्ये आघाडीचे स्थान मिळवले आहे. तसेच, महिंद्राचे ऑटोमोटिव्ह क्षेत्र, कृषीव्यवसाय, एअरोस्पेस, सुटे भाग, कन्सल्टिंग सर्व्हिसेस, संरक्षण, ऊर्जा, आर्थिक सेवा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, रिटेल,
स्टील व दुचाकी या क्षेत्रांत कार्यरत आहे.
२०१५ मध्ये, महिंद्रा अँड महिंद्राला इकॉनॉमिक टाइम्सतर्फे भारतातील बेस्ट कंपनी फॉर सीएसआर म्हणून गौरवण्यात आले. सन २०१४ मध्ये महिंद्राचा समावेश फोर्ब्ज ग्लोबल २००० या जगातील सर्वात मोठ्या व सर्वात शक्तिशाली नोंदणीकृत कंपन्यांच्या यादीत करण्यात आला. सन २०१३ मध्ये, महिंद्रा समूहाला इमर्जिंग मार्केट्स श्रेणीत फायनान्शिअल बोल्डनेस इन बिझनेस अॅवॉर्ड
मिळाला.