अहमद फैयाज यांचे नविन पुस्तक ‘बेस्टसेलर’ प्रकाशित
पुणे अनादर चांन्स, स्कॅम सारख्या विख्यात आणि बेस्टसेलिंग पुस्तकाचें प्रसिद्ध लेखक अहमद फैयाज यांनी आपले नवीन पुस्तक बेस्टसेलिंगने पुन्हा कमबॅक केले आहे. अाज क्रॉसवर्ड औंध येथे या पुस्तकाचे अनावरण झाले झाले.
“बेस्टसेलर” हे प्रामुख्याने एक मनोरंजक आणि अद्वितीय कथानक आहे. हे प्रकाशन उद्योगातील आतील घडामोडींचे अतिशय विनोदी स्वरूपात वर्णन करते.यात असंभव गोष्टींस संभव करण्याचा प्रयत्न, गुतांगुंत, विलक्षण युक्त्या, जीवन आणि प्रेम असे अनेक संघर्ष एक संकटात सापडलेल्या प्रकाशन व्यवसायाच्या माध्यमातुन दाखविण्यात आला आहे.
पुस्तकाची कथा कलीम पब्लिशिंग पासुन सुरु होते, जे एकेकाळी शीर्षस्थानी होता, परंतु आता गहन संकटात आहे, त्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी अक्षयला लंडनहून मुंबईत पाठविण्यात आले आहे. त्यांला यश मिळवण्यासाठी काहीतरी मार्ग शोधणे आवश्यक आहे. लेखकाने अक्षयच्या संघर्षांद्वारे प्रकाशनातील काही गोष्टी कशा प्रकारे चालवल्या जातात याचे वर्णन केले आहे.
अहमद फैयाज यांचा जन्म बेंगलुरु येथे झाला, त्यांनी पुणे येथे आपले शिक्षण पूर्ण केले लव्ह लाइफ अँड ऑल द झॅज, अनादर चॅन्स, स्कॅम, अर्बेने शॉर्ट सीरिज ही त्यांची काही वाचकांकडून मोठ्या प्रमाणावर मागवली गेलेली पुस्तके आहेत.