‘पुनर्वापर , पुनरनिर्माण आणि टिकाऊ संकल्पनेतुन साकारलेल्या उत्पादनांबरोबरच ‘भीमथडी सिलेक्ट
पुणे– ग्रामीण संस्कृतीचा शहरांशी साधलेला एक संवाद सोहळा म्हणून भीमथडी जत्रा नावारूपास आली. महाराष्ट्राची संस्कृतीत ‘जत्रा’ म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, खरेदीचा, भेटीगाठीचा, सांस्कृतिक आदान-प्रदानतेचा एक सणच असतो. भीमथडी जत्रा गेल्या १३ वर्षांपासून पुण्यात अॉग्रीकल्चरल डेवलपमेन्ट ट्रस्ट, बारामती या संस्थेच्या वतीने भरवली जाते. ही जत्रा २२ ते २६ डिसेंबर पर्यंत अॉग्रीकल्चरल ग्राऊंड, सिंचननगर, पुणे येथे होणार आहे.
अॅग्रीकल्चरल डेवपलपमेन्ट ट्रस्ट, बारमतीच्या सौ. सुनंदा पवार यांच्या हस्ते २२ डिसेंबर रोजी भिमथडीचे उद्घाटण होईल. ह्या वर्षी २०० हून अधिक ग्रामिण संस्कृतीचे स्टॉल भीमथ़डी मध्ये पहावयास मिळतील
अॅग्रीकल्चरल डेवपलपमेन्ट ट्रस्ट, बारमतीच्या सौ. सुनंदा पवार यांच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण कृतीशील मार्गदर्शातून, मेहनतीतून ‘भीमथडी जत्रा’ हा अभिनव उपक्रम नावरूपाला आला. यंदा भीमथडी जत्रा आपल्या १३ व्या वर्षात पदार्पण करते आहे. या वर्षीच्या भीमथडी जत्रेला पुणेकर भरघोस प्रतिसाद देतील, असा विश्वास त्यांना आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, महिला बचत गटांची दर्जेदार उत्पादने, हस्तकला वस्तू , महाराष्ट्राचे अस्सल खाद्य पदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन या सर्व गोष्टींचा एकाच छताखाली पुणेकरांना आनंद घेता येतो. म्हणून भीमथडी जत्रेला गेल्या १३ वर्षात पुणेकरांनी प्रचंड प्रेम दिलं. ग्रामीण महिलांच्या मेहनतीला आणि ग्रामीँण कलाकरांच्या कलागुणांना दाद देण्याच्या उद्देश्यातुन आम्ही भीमथडी जत्रेची सुरवात केली. यातून महिला बचत गटांची आर्थिक उन्नती झाली. अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहील्या.
सई पवार नेगी यांच्या संकल्पनेतुन साकारलेली भिमथाडी सिलेक्ट थिम ह्यावर्षी देखील पहावयास मिळते ज्यात फॉशनच्या अनोख्या स्टॉलचा एक विशेष विभाग आहे. येथे भारतातील पारंपारिक हातमाग, हस्तकला आणि इतर हस्तशिल्प पुनरुज्जीवन व कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, “यावर्षी पारंपारिक हातमाग, हस्तकला आणि भारताच्या इतर शिल्पकला पुनरुज्जीवित आणि टिकवून ठेवण्याच्या क्षेत्रात काम करणार्या कारागीर, आणि डिझायनर असलेल्या 38 स्टॉलचा एक विशेष विभाग दर्शविला जाईल. गेल्या वर्षी पुणेकरांचा त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला होता आणि यामुळे त्यांना प्रचंड यश मिळाले. भीमथाडी सिलेक्टमध्ये ‘रीसायकल, रीयूज अँड सस्टेन’ च्या विचारधारेच्या आधारावर उत्पादनांची थीम तयार केली आहे. ”
भीमथडी सिलेक्ट मधील डिझाइनर आणि कारागीरांनी नैसर्गिक साहित्य जसे सेंद्रिय कापूस, खादी, लिनेन आणि नैसर्गिक रंगांचा वापर केला आहे. धाग्यांपासून ते अंतिम उत्पादनापर्यंत प्रत्येक कपडे कुशल विणकर आणि कारागीरांनी हाताने तयार केली आहेत.
भीमथडी जत्रेचे १३ वे वर्ष –
शनि २२ डिसेंबर – संध्याकाळी ४ ते रात्री १०
रविवार २३ ते बुधवार २६ डिसेंबर – सकाळी १० ते रात्री १०
स्थान: अँग्रीकल्चरल कॉलेज ग्राउंड, सिंचन नगर, पुणे
या वर्षीच्या भीमथडी जत्रेचे वेळापत्रक-
1 |
२२ डिसेंबर |
उद्घाटन (४ वाजता) |
2 |
२२ डिसेंबर |
सुफियान मलिक – कश्मीरी संगीतकार यांची राबाब प्रस्तृती (सायंकाळी ७ वाजता ) |
3 |
२३ डिसेंबर |
त्रिधरा-आभाऊती आणि ऋषिकेश पवार यांचे सादरीकरण, एकाच छताखाली असलेल्या लोकांनी जीवनाच्या वेगवेगळ्या मार्गातून साकारलेली कथा, यातील शास्त्रीय कथ्थक या उत्सवाची सुंदरता प्रकट करेल आणि एक जादुई ताल निर्माण करेल
(सायंकाळी ७ वाजता) |
4 |
२४ डिसेंबर |
बॉलीवूड फिल्म / म्युझिक इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कलाकार कविता सेठ यांचे प्रस्तृतीकरण जसे की इकतारा, तुम हे बंधू, जीते हे चल इत्यादी (सायंकाळी ७ वाजता) |
5 |
२५ डिसेंबर |
अभंगा रीपोस्ट-जाझ स्वरूपात मराठी अभंगाचा अनन्य अनुभव (सायंकाळी ७ वाजता) |
6 |
२६ डिसेंबर |
स्पंदन – कथक आणि बॉलीवूड फ्यूजन
(सायंकाळी ७ वाजता) |