पद्मश्री लीला पूनवाला यांनी वूमेन्स इकोनॉमिक फोरम पुरस्कार
पुणे: प्रत्येक वर्षी वूमेन्स इकोनॉमिक फोरम (डब्ल्यू.ई.एफ महिला आणि महिला उद्योजकांच्या विकासासाठी आणि सक्षमतेसाठी समर्पित माध्यम आहे) महिला विकास आणि सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील योगदान करणार्या महिलांना त्यांच्या योगदानांसाठी सन्मानित करते. आणि ह्या वर्षी देखील अश्याच प्रकारे पद्मश्री मिसेस लीला पूनावाला (अध्यक्ष, लीला पूनवाला फाऊंडेशन) यांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या परोपकारी कार्यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला.
मुलींचे शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी लीला पूनावाला फाउंडेशन कार्य करते .
लीला पूनवाला फाऊंडेशनच्या माध्यमातुन लीला पूनवाला यांनी 5848 मुलींना 12220 शिष्यवृत्ती देऊन सशक्त केले आहे.
लीला पुनावालांसाठी त्यांना मिळालेला हा सन्मान खरोखरच एक स्मरणीय आणि महत्वाचा होता. लीला फेलो आणि मुली (पोस्ट ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॉजुएट स्कॉलरशिप प्राप्त केलेल्या एलपीएफ च्या विद्यार्थीनी) यांच्या उपस्थितीत या विशेष प्रसंगाला विशेष महत्त्व आले.
मेजर.राजारावर्धन सिंग राठोड (माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री) प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. इतर मान्यवरांमध्ये कॉर्पोरेट, सामाजिक आणि बॉलीवूडमधील व्यक्तीं देखील उपस्थीत होत्या.