पुणे- मित्रमंडळ चौकातील ९ एकराचा भूखंड बळकावणाऱ्या बिल्डरवर तातडीने पोलिसात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत असताना महापालिका आयुक्तांनी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या ३ पत्रांना देखील उत्तरे न देता ,त्यांनाही जुमानलेले नाही .. नेमके पहा आणि ऐका.. आमदार मिसाळ यांनी काय म्हटले आहे …
.या भूखंडाबाबत चे वृत्त स्थानिक दैनिकातुन हि अनेक दिवस प्रसिध्द होते आहे. एका दुरचीत्रवाहीनीने संबधित भूखंडावर विशेष रिपोर्ट सदर केला आहे या बिल्डरचे म्हणणे हि जागा माझीच आहे ,पालिकेने आपली जागा शोधावी पण पालिकेच्या स्तरावरून याबाबत कोणताही खुलासा करण्यात येत का नाही ? असा सवाल सर्वांना सतावतो आहे .. तसाच तो भाजपच्या आमदारांना ही सतावतो आहे . आता मुख्यमंत्र्यांना याबाबत लक्ष घालावे लागणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे .