- दुहेरीत भारताच्या अर्जुन कढे व साकेत मायनेनी जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश
पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए आयोजित आणि एटीपी व एआयटीए यांच्या मान्यतेने होत असलेल्या केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उप-उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या राष्ट्रीय क्रमांक एक व स्पर्धेतील अव्व्ल मानांकित प्रज्ञेश गुणेश्वरनला नेदरलॅंडच्या चौदाव्या मानांकित टिम वान रीजथोवेन यांच्याकडून ४-६, ७-५,६-३ असा पराभव पत्करावा लागला. भारताच्या राष्ट्रीय क्रमांक दोन सुमित नागल, राष्ट्रीय क्रमांक तीन रामकुमार रामनाथन, राष्ट्रीय क्रमांक चार ससी कुमार मुकुंद यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश.
शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी येथील टेनिस संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उप-उपांत्यपूर्व फेरीत चौदाव्या मानांकित नेदरलॅंडच्या टीम वान रिजथोवेन याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत अव्वल मानांकित भारताच्या प्रजनेश गुन्नेश्वरणचा ४-६,७-५,६-३ असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून स्पर्धेत खळबळजनक निकालाची नोंद केली. 22वर्षीय जागतिक क्रमवारीत 324व्या स्थानी असलेल्या रिजथोवेनने प्रजनेशपेक्षा वरचढ खेळाचे प्रदर्शन केले. 2तास 10 मिनिटे चाललेल्या या लढतीत पहिल्या सेटमध्ये प्रजनेशने सुरेख सुरुवात करत हा सेट रिजथोवेनविरुद्ध 6-4असा संघर्षपूर्णरित्या जिंकला. पण दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या रिजथोवेनने कमबॅक करत प्रजनेशविरुद्ध हा सेट 7-5 असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये रिजथोवेनने आक्रमक व चतुराईने खेळ करत हा सेट 6-3 असा सहज जिंकून प्रजनेशचे आव्हान संपुष्टात आणले.
भारताच्या राष्ट्रीय क्रमांक दोन व स्पर्धेतील तिसऱ्या मानांकित सुमित नागलने रशियाच्या तेराव्या मानांकित ईवान नेदेल्को याचा २-० असा पराभव केला. ईवान नेदेल्को याला पाठीच्या दुखापतीमुळे सामना सोडावा लागला. भारताचा राष्ट्रीय क्रमांक तीन व स्पर्धेतील सहावा मानांकित खेळाडू रामकुमार रामनाथनने तुर्कीच्या बाराव्या मानांकित केम ईलकेल याचा ६-३,६-४ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताचा राष्ट्रीय क्रमांक चार व स्पर्धेतील आठवा मानांकित खेळाडू ससी कुमार मुकुंदने तुर्कीच्या एर्गी किर्रकीन याचा ६-०,६-२ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
भारताच्या मनिष सुरेशकुमारला ऑस्ट्रेलीयाच्या दुसऱ्या मानांकित जेम्स डकवर्थ यांच्याकडून ६-१,६-२ असा पराभव पत्करावा लागला .
दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या तिसऱ्या मानांकित अर्जुन कढे व साकेत मायनेनी या जोडीने रशियाच्या बोगदान बोब्रो व इवान नाइडल्को यांचा ६-४,४-६,१६-१४ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दुसरी मानांकित जोडी भारताच्या विष्णु वर्धन याने जपानच्या तोशिहीदे मत्सुई याच्या साथीत कॅनडाच्या स्टिव्ह डिझ व स्पेनच्या रोबेर्टो ओल्मेडो यांचा ३-६, ६-२, १०-४ दुहेरीच्या असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
ऐकेरी गट- उप-उपांत्यपूर्व
टिम वान रीजथोवेन(14)(नेदरलॅंड) वि वि प्रज्ञेश गुणेश्वरन (१)(भारत) ४-६, ७-५,६-३
रामकुमार रामनाथन(६)(भारत) वि वि केम ईलकेल(१२)( तुर्की ) ६-३,६-४
ससी कुमार मुकुंद(८)(भारत) वि वि एर्गी किर्रकीन(तुर्की)६-०,६-२
सुमित नागल(३)(भारत) वि वि ईवान नेदेल्को(१३)(रशिया) २-०(सामना सोडला)
जेम्स डकवर्थ(2)(ऑस्ट्रेलीया) वि वि मनिष सुरेशकुमार(भारत) ६-१,६-२
रोबेर्टो ओल्मेडो(७)(स्पेन) वि वि सुईची सेकिगुची(11)(जपान)६-२,६-४
स्टिव्ह डिझ(४)(कॅनडा) वि वि ब्रेडन क्लेन(१५)(इंग्लंड)६-०,६-२
जे क्लार्क(5)(ग्रेट ब्रिटन) वि वि ली डक-ही(९)(दक्षिण कोरीया) ६-१,६-४
दुहेरी गट- उपांत्यपुर्व फेरी
अर्जुन कढे(भारत)/साकेत मायनेनी(भारत)(3) वि वि बोगदान बोब्रो(रशिया)/इवान नाइडल्को(रशिया)६-४,४-६,१६-१४
तोशिहीदे मत्सुई(जपान)/ विष्णु वर्धन(भारत)(2) वि वि स्टिव्ह डिझ(कॅनडा)/ रोबेर्टो ओल्मेडो(स्पेन) ३-६, ६-२, १०-४