पुणे- बावधन बु. च्या नळ – पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते समारंभपूर्वक संपन्न झाले . महापालिकेतील नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी या योजनेसाठी स्वतः चे वैयक्तिक १५ लाख रुपये निधी म्हणून दिल्याने हि योजना मार्गी लागते आहे . त्यामुळे लवकरच बावधनचा पाणी प्रश्न सुटणार आहे .पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .