पुणे ता. १३. मधुरंजनी संस्थेतर्फे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व संगीत रसिक कै. मधुकर नीलकंठ ऊर्फ अप्पासाहेब भिसे यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त गायिका कविता खरवंडीकर यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या शनिवारी (दि.१६) सायंकाळी ५.३० वाजता नवी पेठ येथील निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृहात ही मैफल रंगेल. अभिजात शास्त्रीय संगीताबरोबरच उपशास्त्रीय व अभंग या माध्यमातून कविता खरवंडीकर आपली कला सादर करतील. यावेळी धनंजय खरवंडीकर (तबला) तर प्रसिद्ध संगीतकार संजय गोगटे (हार्मोनियम) साथसंगत करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य स्वरूपात खुला असेल.
कविता खरवंडीकर यांच्याविषयी :-
कविता खरवंडीकर या डॉ. अलका देव मारुलकर आणि पं. श्रीकृष्ण (बबनराव) हळदणकर यांच्या शिष्या आहेत. पं.हळदणकर यांच्याकडून जवळजवळ २० वर्षे आग्रा व जयपूर घराण्याच्या गायकीचे विधिवत धडे त्यांनी घेतले आहेत.