पुणे- आज पुण्यात नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदी च्या निर्णयाच्या समर्थनार्थ खासदार संजय काकडे यांनी काढलेल्या रॅलीत (शक्ती प्रदर्शनात ) पालक मंत्री गिरीश बापटांचे हेर उपस्थित होते. एकूणच काकडेंच्या मागे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस असल्याची एकीकडे चर्चा होती तर दुसरीकडे मुळ पुण्यातील भाजपचे असलेल्यांची पोटदुखी देखील असल्याचे दिसत होते . या अनुषंगाने ‘निष्कामी निष्ठावंत आणि धनशक्ती चा प्रभाव ‘अशी पक्षांतर्गत लढाई असल्याचे स्पष्ट होत होते . मनीष कांबळे , रमेश काळे असे बहुजन समाजाचे नगरसेवक आणि खासदार अनिल शिरोळे स्वतः या रॅलीत सहभागी होते . मात्र शिरोळे स्वतः सहभागी झाले तरी त्यांचे कार्यकर्ते नसल्याने , ते देखील हातचे राखून इथे आल्याचे बोलले जात होते . रॅलीत आलेली माणसे कशी कोठून आली ? याचा शोध घेताना काही कॅमेरामन चा देखील आधार घेवून मुलाखतीदेखील घेण्यात आल्या .
या सर्व परिस्थितीत ही रॅली म्हणजे भाजापातील नेतृत्वाच्या राजकारणाचा भाग आहे कि काय ? असा प्रश्न साहजिकच निर्माण झाला होता . या पूर्वी झालेल्या भाजपच्या कार्यक्रमात काकडेंना पुढे न येवू देणे , धक्काबुक्की करीत बाजूला सारणे असे प्रकार ही झाले . काकडेंनी त्यावर मात करायला म्हणून ज्या ‘मिडिया पर्सन ‘ ची साथ घेतली त्यांनीच बापटांसाठी जणू इथे हेरगिरी चालविली असे दिसत होते . एकीकडे बहुजनाविरुद्ध , आणि दुसरीकडे नीतिमत्ते विरुद्ध ची लढाई असे चित्र रंगविले जात असले तरी भाजपच्या पुण्यातील नेतृत्वा बद्दल चीच हि लढाई … ‘असल्याचे स्पष्ट होत होते .