जुन्नरमध्ये उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक
जुन्नर /आनंद कांबळे
गुलालाची फुलांच्या पाकळ्याचा वर्षाव ढोल,ताशा,झांजपथकांचा गजरात जुन्नरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणूकीची सांगता 12 तासांनी झाली. मानाचा गणपती असलेल्या सिद्धिविनायक
रविवार पेठ मंडळाच्या गणपतीच्या आरतीने आमदार शरद सोनवणे,जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे, नरेंद्र तांबोळी,अध्यक्ष शिवदर्शन खत्री ,गणेशभक्त कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आल्यावर मिरवणूकीचा प्रारंभ झाला.तर विसर्जनासाठी मंडळांनी पुष्पसजावट तसेच विद्युत रोषनाईची सजावट करुन देखावे सादर केले होते.कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मिरवणूक पार पडली.विसर्जन घाटांवर काही ठिकाणी नगरपालिकेने
निर्माल्य कलशांची व्यवस्था केली होती.तर आगर पेठ येथे स्वामी समर्थ परिवार व सुहास शेटे मित्र मंडळाने निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली होती.रविवार पेठ गणेशोत्सव मंडळाने फुलांच्या सजावटीबरोबर पारंपरिक रथातून मिरवणूक मार्गस्थ केली.
विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या १४ नोंदणीकृत मंडळांनी मोठ्या उत्साहात मिरवणूकीत सहभाग घेतला.यामध्ये मानाचा पहीला गणपती असलेल्या रविवार पेठ गणेशोत्सव मंडळाबरोबरच,कल्याण पेठ गणेशोत्सव मंडळ,,लोणार आळी पेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,शंकरपुरा पेठ सर्वोत्सव मंडळ,क्रांती तरूण मंडळ,वरली आळी पेठ गणेशोत्सव मंडळ, ब्राह्मण बुधवार पेठ गणेशोत्सव मंडळ,राष्ट्रीय तेली बुधवार पेठ गशेशोत्सव मंडळ , भोई
आळीतील जगदंबा मंडळ,हुतात्मा भाई कोतवाल गणेशोत्सव मंडळ ,वरचा माळीवाडा मंडळा,पणसुंबा पेठ गणेशोत्सव मंडळ,सदाबाजार पेठ गणेशोत्सव मंडळ,परदेशपुरा पेठ सर्वोत्सव आदींचा समावेश होता.
जुन्नर नगरपालिका तसेच पोलिसांच्या वतीने सर्व मंडळांचे नगरपालिकेजवळ स्वागत करण्यात आले.नगराध्यक्ष शाम पांडे,उपनगराध्यक्ष अलका फुलपगार,सर्व नगरसेवक,तसेच विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित गणेश मंडळांचे
स्वागत करण्यात आले.नगरपालिकेच्या चौकात विविध मंडळांनी आणलेल्या ढोल,ताशा पथकाचे खेळ सादर करण्यात आले.नगरपालीका चौकातून रविवार पेठ गणेशोत्सव मंडळाचा गणपती सायंकाळी साडेसात वाजता
मार्गस्थ झाला.तर शेवटचा परदेशपुरा सर्वोत्सव मंडळाचा गणपती साडेअकरा नंतर मार्गस्थ होऊन रात्री साडेबारा वाजेपर्यंत विसर्जन झाल
रात्री नऊ नंतर मोठ्या प्रमाणात पावसाने सुरुवात केली.उशीरापर्यंत हा पाऊस सुरु असल्याने गणपतीच्या मिरवणूकीत नाचण्याचा आनंद घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.गणेशविसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी
उशीरा पर्यंत थांबणाऱ्या गणेशभक्तांची देखील पावसाने उपस्थिती कमी झाली होती.