इंजिनिअर्स अँड बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन शिवनेरी ता.जुन्नरच्या अध्यक्षपदी इंजिनिअर मुकेश ताजणे तर सचिव पदी आदित्य पुरवंत
जुन्नर /आनंद कांबळे
इंजिनिअर्स अँड बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन शिवनेरी ता.जुन्नरच्या सन २०१९ -२० च्या कार्यकारणीच्या संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ नुकताच महालक्ष्मी लाँन्स बारव येथे संपन्न झाला .
अध्यक्षपदी इंजिनीअर मुकेश वसंत ताजणे तर सचिवपदी इंजी. आदित्य महेश पुरवंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमास आर्किटेक्ट गव्हर्नर व्हॅल्यूयर राजेंद्र कोरे, जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे, एशियन बाथ डिव्हिजन महाराष्ट हेड तुषार कुलकर्णी, शिवाजी चाळक( संस्थापक शिवांजली संथा चाळकवाडी )यांसह तालुक्यातील इंजिनीअर, बांधकाम व्यावसायिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माणसाच्या आयुष्यातील घराचे स्वप्न,कल्पना अविष्कार प्रत्यक्षात वास्तू रुपात निर्माण करण्याची व समाजाची सेवा करण्याची संधी आम्हा इंजिनिअर्सला मिळते ह्याच्या सारखा आत्मिक आनंद दुसरा नसल्याचे मत नूतन अध्यक्ष मुकेश ताजणे यांनी या कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्किटेक्ट गव्हर्नर व्हॅल्यूयर राजेंद्र कोरे बोलताना म्हणाले कि आजच्या जागतिकीकरणाच्या जीवनात वास्तूचा पाया भक्कम करणाऱ्या इंजिनिअर्सने आपल्या निरामय आरोग्याचा हि पाया भक्कम कारणे गरजेचे आहे. या पदग्रहण कार्यक्रमप्रसंगी विनायक कर्पे, संजय गांधी, तुषार लाहोरकर, संतोष नवले आदींनी मनोगते व्यक्त केली. तसेच माजी अध्यक्ष संतोष नवले, नवनिर्वाचित अध्यक्ष मुकेश ताजणे व सर्व संचालक मंडळ यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद झगडे यांनी, सूत्रसंचालन विनय वाबळे यांनी तर आभार अनिल जाधव यांनी मानले.
इंजिनिअर्स अँड बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन शिवनेरी जुन्नरची नवनिर्वाचित कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष मुकेश ताजणे, सचिव आदित्य पुरवंत, उपाध्यक्ष जितेंद्र काळे, खजिनदार अनिल जाधव तर विनय वाबळे, प्रदीप थोरवे, नितीन माळवदकर,संतोष केदारी,सचिन मलठणकर, संतोष कबाडी हे संचालक आहेत.