जि.प.प्राथ.शाळा भिवाडे बुद्रुक येथे शालेय साहित्य व स्पोर्ट गणवेश वाटप
जुन्नर /आनंद कांबळे
जि.प.शाळा भिवाडे बु!! इंगळूण (वाघेवाडी) मारुती पुनाजी डामसे (काळू नाना) यांनी इ.१ली ते ४थी च्या विद्यार्थी /विद्यार्थीनी यांना शालेय साहित्य स्पोर्ट्स ड्रेस , बस्कर, वह्या, पेन या वस्तूंचे वाटप केले .
यावेळी ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांना आमटी भात व जिलेबी असे जेवण देण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक बाळू कडू आणि सीमा डोके यांनी केले.
यावेळी मागील वर्षात शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक जडणघडणीत अतिशय प्रभावी पणे बदल घडवून आणल्याबद्दल शाळेतील शिक्षक बाळू कडू आणि सीमा डोके यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी सरपंच नामदेव विरणक, उपसरपंच नंदा विरणक, गणेश विरणक, धावजी विरणक, दिलीप पारधी, श्यामकांत विरणक,बुधा बांबळे, विठ्ठल विरणक, युवराज विरणक, लोचना विरणक, सिताबाई विरणक, बाळू गवारी, निलेश डोळस, विठ्ठल मुठे,इत्यादी मान्यवरांसह ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.