खेड घाटातील बाह्यवळण कामे लवकरात लवकर पूर्ण करा : खा डॉ अमोल कोल्हे.
प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना सोबत घेऊन केली घाटाची पाहणी
जुन्नर /आनंद कांबळे
शिरूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी पुणे -नाशिक रोडवरील खेड घाटामधील समस्या ट्रॅफिक समस्या या संदर्भात अधिकाऱ्यांना समवेत घाटाची पाहणी केली .
पुणे-नाशिक ट्राफिक समस्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असून याकडे कदापि दुर्लक्ष करून चालणार नाही लवकरात लवकर ट्राफिक समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचं डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले
प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आज डॉ कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या
यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या खासदारांसमोर मांडल्या. यापूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अधिकारी वर्गास सोबत घेऊन जमीन अधिग्रहित केली, तसेच स्वार्थासाठी व स्वताची जमीन वाचवण्यासाठी हा शेतकऱ्यांच्या जमिनी घालवल्या असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
याप्रसंगी खेड चे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर, कृषी उत्पन्न बाजार समिती खेड संचालक धैर्यशील पानसरे, तुकाईवाडीचे सरपंच महेंद्र ठिगळे, प्रवीण कोरडे, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते