डाँ.अमोल कोल्हे शिवनेरीवर
जुन्नर / आनंद कांबळे
शिरुर लोकसभा मतदारसंघातील विजयानंतर शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई मातेची पूजा केली तसेच शिवकुंज येथील बालशिवाजी व जिजाऊ मातेस अभिवादन केले , शिवजन्मभूमीला नतमस्तक झाले.
शिवनेरी किल्ल्यावर विजयानंतर नतमस्तक होणारा पहिलाच खासदार म्हणून डाँ.अमोल कोल्हे ठरले आहेत. कोल्हे हे खरे मावळे आहेत अशी भावना शिवप्रेमी जनतेत निर्माण झाली आहे.
शिरुर मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणार आहोत. शिवमहोत्सव सुरु करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शंभू स्मारक राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यास प्राधान्य दिले.
यावेळी युवा नेते अतुल बेनके , दिनेश दुबे,भाऊ कुंभार ,पापाशेठ खोत,सुनिल ढोबळे आदि मान्यवर त्यांच्या सोबत होते.