प्रा.विनायक खोत यांना शंभू पुरस्कार
जुन्नर /आनंद कांबळे
छत्रपती युवा क्रीडा मंडळ महाराष्ट्र राज्य व शाओलीन कुंग फु इंटरनॅशनल ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने मानाचा राज्यस्तरीय शंभू पुरस्कार जुन्नर येथील प्रा.विनायक खोत यांना देवून गौरविण्यात आले.दूर्ग संवर्धनात केलेल्या उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्रा.विनायक खोत यांना शंभू पुरस्कार मिळाला.
धुळे येथील कल्याण भवन येथे पार पडला . कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भारतीय खो खो संघाचे माजी कॅप्टन मा.आनंद पवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक मा. भूषण काटे , लेखक मा. हरी महाजन , प्रसिद्ध गायक पी.गणेश, मराठी चित्रपटाचे अभिनेते मा. गणेश खाडे , अभिनेत्री अपूर्वा शेलगावकर, शिफू व्ही सुरेंद्रन सामाजिक कार्यकर्त्या शिवमती किरण नवले , आयोजन समिती अध्यक्ष विकास मराठे , सचिव प्रसाद पाटील , मनोज रुईकर ,हेमंत भडक, अनिल पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हि प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात करण्यात आली. ह्यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समिती अध्यक्ष विकास मराठे ह्यांनी केले. कार्यक्रमाची सुरवातीला लवकरच सम्पूर्ण महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट फफूटा चे पहिले पोस्टर व गाणे लाँच करण्यात आले. ह्यावेळी फफूटा चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण काटे ह्यांनी चित्रपटाविषयी माहिती दिली. त्यानतंर संपूर्ण महाराष्ट्रातून सामाजिक, शैक्षणिक , क्रीडा , पत्रकारिता , वैद्यकीय, उद्योजक , पर्यावरण, कृषी, कला क्षेत्रातील एकूण ४५ मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात जितेंद्र देसले ,मा. यशवंत गोसावी, मनीषा माली, शिवमती किरण नवले, प्रवीण महाजन , अनिल मराठे , योगेश पाटील , विनायक खोत, एक वादळ भारतचे, प्रज्ञा मालपुरे , वैशाली मालपुरे, दीपक पाटील , अतुल दहिवेलकर , अनिल चव्हाण, पवन मराठे,डॉ. योगेश ठाकरे , डॉ.अमित पाटील, कैलास देवरे , पांडुरंग पाटील , संतोष देवरे , नितीन पाटील , गोकुळ पाटील , डॉ. विजय भोसले , प्रज्ञा पाटील, प्रसाद पाटील, गिरीश दारुंटे , वीरेंद्र मोरे , प्रा. रवींद्र निकम , सिद्देश कॉम्प्युटर्स , रामकृष्ण सूर्यवंशी , सरमोड पाटील , स्वप्नील रमेश पाटील , विशाल सूर्यवंशी, प्रवीण बारकू खैरनार ह्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ह्यावेळी चित्रपटाचे नायक गणेश खाडे व अभिनेत्री अपूर्वा शेलगावकर ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ह्यानंतर प्रसिद्ध गायक मा. पी गणेश ह्यांनी आपल्या आवाजाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांतर समस्त फफूटा टीम च्या वतीने आयोजन समिती अध्यक्ष विकास मराठे यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या यशश्वी होण्यासाठी संदेश दाभाडे , मंगेश पाटील, प्रमोद पाटील, दिग्विजय पाटील, ऋषीं दाभाडे , कुणाल चौधरी , शुभम शिंदे, पंकज पाटील, राजेंद्र देवरे, पवन सोनार , आदींनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलकर्णी सर ह्यांनी केले