मोहम्मद रफी जयंतीनिमित्त ‘माधुर्य मधुरता’ शुक्रवारी
पुणे : स्वरसम्राट मोहम्मद रफी यांच्या जन्मदिनानिमित्त महक व म्युझिक इंडिया प्रस्तुत ‘माधुर्य मधुरता’ या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
ज्यांच्या गायनात माधुर्य आणि मधुरता आहे, अशा मोहम्मद रफी आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या युगुलगीतांची मैफल रंगणार आहे. शुक्रवार, दि. २१ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५.०० वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ही मैफल रंगणार आहे.
प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल आणि गफार मोमीन यांच्या जोडगोळीने रसिकांना आतापर्यंत मंत्रमुग्ध केलेले आहे. ‘माधुर्य मधुरता’मधूनही या दोघांना ऐकण्याची संधी पुन्हा एकदा पुणेकर रसिकांना मिळणार आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन सईद खान करणार आहेत, तर मैफलीला आकार देणारे निवेदन संदीप पंचवाटकर करणार आहेत.