डॉ. मिलिंद पांडे म्हणाले, “तुमची आमची प्रत्येकाची ‘समाजसेवेची’ व्याख्या वैयक्तिक पातळीवर पूर्णपणे भिन्न असू शकते. बाबा आमटेंसारखे महान समाजसेवक असोत वा आपल्या कॉलेजच्या समाजसेवा प्रबंधात जीव ओतून काम करणारा एखादा विद्यार्थी कार्यकर्ता असो, सामाजिक बांधिलकी जपणारी एखादी कोर्पोरेट बॉस असो वा आपल्या घरातील वरकाम करणाऱ्या मावशींना प्रेमाने औषध देणारी एखादी गृहिणी असो, आपणही समाजासाठी काहीतरी करावे, असे आपल्यातील बहुतेकांना वाटत असते. ही समाजसेवा म्हणजे नेमकी काय आणि कशी असते, हे समजावून घेण्यासाठी हे चर्चासत्र आयोजिले आहे. त्यामध्ये याच क्षेत्रात सर्वस्व वाहून देत काम करणारे तीन मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
‘समाजसेवा म्हणजे नक्की काय रे भाऊ?’वर चर्चासत्र
डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, श्रीगौरी सावंत करणार मार्गदर्शन
पुणे : लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे ‘समाजसेवा म्हणजे नक्की काय रे भाऊ?’ अर्थात ‘रिडिफायनिंग सोशल वर्क’ यावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत कोथरूड येथील एमआयटी कॅम्पसमधील स्वामी विवेकानंद सभागृहात हे चर्चासत्र होणार असून, समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाताई आमटे यांच्यांसह एचआयव्ही एड्स पीडितांसाठी आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या बालकांच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या श्रीगौरी सावंत यांना ऐकण्याची आणि त्यांच्याकडून समाजसेवेची व्याख्या समजावून घेण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती एमआयटीचे डॉ. मिलिंद पांडे, लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्टचे शिल्पा तांबे, योगेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
योगेश कुलकर्णी म्हणाले, “सोशल मिडियावर झळकणारे ‘सेल्फी’च्या जमान्यातले समाजकार्य खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या घटकांचे स्वरूप आहे का? हे एका संवेदनशील समाजाचे प्रत्यक्ष दर्शन आहे की फक्त आभासी सूज? शाळा-कॉलेजमधली तरुण पिढी समाजकार्याकडे नेमक्या कश्या दृष्टीने बघते? जो समाज आपल्याला घडवतो, त्या समाजाच्या ऋणाची परतफेड करायची गरज असते का? जर असेल तर ती कोणत्या मार्गाने करणे योग्य? अश्या अनेक प्रश्नांवर विचारमंथन या चर्चासत्रात होणार आहे. सामाजसेवेप्रती नवी क्षितिजे, नवे पैलू उलगडणारे ‘रीडीफायनिंग सोशल वर्क’ हे चर्चासत्र असणार आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे जास्तीत जास्त तरुण पुढे यावेत आणि त्यांनी एका नव्या संवेदनशील समाजाच्या राष्ट्रनिर्मितीत सक्रीय सहभाग घ्यावा हे उद्दिष्ट समोर ठेऊन हे व्यासपीठ तरुणांसाठी उपलब्ध केले आहे.”
शिल्पा तांबे म्हणाल्या, “ज्यांचे संपूर्ण आयुष्यच समाजसेवेचे परिमाण म्हणून ओळखले जाते ते डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाताई आमटे यांना पहिल्या, तर दुसऱ्या सत्रांत एड्सबाधित आणि शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी आयुष्य वेचणाऱ्या श्रीगौरी सावंत बोलणार आहेत. चर्चासत्र सर्वांसाठी विनामूल्य खुले असले, तरी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी http://lokbiradari.deazzle.in संकेतस्थळावर जावे. प्रथम येणाऱ्यांस प्राधान्य असेल. आमटे दाम्पत्य आणि सावंत यांच्यासह माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संचालक अनिकेत आमटे आदी उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क: ९२२६९५८८८८ / ९८२२२७३५४५ / ९६०७०५९२१४ किंवा lokbiradarimitramandalpune@gmail.com यावर संपर्क साधावा.”