आयटीए एसपीएच्या पुणे शाखेचे उद्घाटन डेव्हिड धवन यांच्या हस्ते आयटीए एसपीएचे उद्घाटन
पुणे- इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी स्कूल आॅफ परफाॅर्मिंग आर्टस् (आयटीए एसपीए) पुणे शाखेचे उद्घाटन आज (२३ सप्टेंबर) डेव्हिड धवन, शशी रंजन यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे सेंटरचे संचालक नंदन गिजारे, श्रृती गिजारे आणि केंद्र प्रमु ख, आयटीए एसपीए मैथीली पागे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयटीए एसपीएची सुरूवात २०११ साली शशी रंजन आणि अनू रंजन यांनी केली. आयटीए एसपीएच्या पाच शहरांमध्ये शाखा सुरू होत असून पुणे हे त्यापैकी एक प्रमुख शहर आहे.
यावेळी गिजारे म्हणाले, ”पुणे शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी शिक्षणासाठी पुण्यात येणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतच आहे. अनेक सिने कलाकार पुण्यातील एफटीआयआयमधून शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. थिएटर आणि अभिनयासाठी पुणे शहर ओळखले जाते.” ते पुढे म्हणाले, ”याबरोबरच पुण्यातील संस्कृतीची छाप यामध्ये दिसून येते. या संस्थेतर्फे अभिनय, नृत्य, गायन, माॅडेलींग आणि इमेज ग्रूमिंगचे धडे देण्यासाठी भारतातील नामवंतांना बोलविले जाणार आहे. विद्यार्थ्यांची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी नेहमी प्रयत्न केले जातील,” असा विश्वास त्यांनी दिला.
इंडियन टेलिव्हिजन अकॅडमीच्या गव्हर्निंग काउंसिलमध्ये जे. पी. दत्ता, गुलशन ग्रोव्हर, रविना टंडन, महिमा चौधरी, रूप कुमार राठोड आणि अल्का याग्निक आदी मान्यवर सदस्य आहेत.
मैथिली पागे म्हणाल्या, ”ज्या विद्यार्थ्यांना टीव्ही आणि बाॅलिवडू क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे त्यांना दिशा देणे हे या अकॅडमीचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देऊन त्यांची स्वप्ने साकार करण्याची संधी दिली जाणार आहे.”
येथे गुरू म्हणून अनेक नामवंतांना बोलविले जाणार आहे. माॅडेलिंगसाठी संदिप धर्मा, नृत्यासाठी कुणाल फडके, गायनासाठी अली हुसैन आणि मैथिली पागे या अभिनय विभागाच्या विभाग प्रमुख असतील.
कला क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्या विद्यार्थांसाठी ही अकॅडमी ‘गेट वे टू बाॅलिवूड’ ठरेल, अशी खात्री श्रृती गिजारे यांनी व्यक्त केली.