पुणे-भाजपचे शहर अध्यक्ष सांगतात आमचा शहरात हेल्मेट सक्ती राबवायला विरोध आहे ,सभागृहनेते सांगतात ,आमचा विरोध आहे ,आम्ही सक्ती विरोधात महापालिकेत तहकुबी मांडू .. आणि या सर्व पार्श्वभूमीवर पुण्याच्या महापौरांनी मात्र हेल्मेटसक्ती वर काहीशी असपष्ट ,दुटप्पी ..सोप्याच शब्दात सांगायचं तर डबल ढोलकी भूमिका घेतल्याचे आज दिसले आहे . या पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या मुख्य सभेत कोण कोण नगरसेवक हेल्मेट सक्तीच्या बाजूने पोलिसांना दंडवसुलीसाठी कौल देतील आणि कोण कोण नगरसेवक नागरिकांवर कारवाई करू नये म्हणून हेल्मेट सक्तीच्या विरोधात कौल देणार हे स्पष्ट दिसणार आहे …. भाजपचे संदीप खर्डेकर ,राष्ट्रवादीचे चेतन तुपे पाटील ,कॉंग्रेस चे रमेश बागवे या शिवाय अंकुश काकडे ,शांतीलाल सुरतवाला ,संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे ,मनसे च्या रुपाली पाटील आशिष साबळे आदींनी हेल्मेट सक्तीच्या विरोधात आंदोलने केलीत आणि त्यासाठी इशारेही दिलेत . या सर्व परिस्थितीत महापौरांच्या आजच्या वक्तव्याने हेल्मेट सक्ती संदर्भात ..महापालिकेतील नेत्यांमधून नेमक्या प्रतिक्रीया उमटतात हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे … तोवर पहा .. भाजपचे शहर अध्यक्ष गोगावले काल काय म्हणाले होते … सभागृह नेते भिमाले काल काय म्हणाले होते .. आणि आज नेमक्या यावर महापौर काय म्हणाल्यात …