पुणे – पारंपारिक हस्तकला करणार्या कारागिरांस प्रोत्साहित करण्यासाठी हॅन्ड्स ऑफ इंडिया ने आपले भव्य वस्त्र प्रदर्शन पुन्हा एकदा टिळक स्मारक मंदिर येथे भरवले आहे. हे प्रदर्शन गुरवार २१ सप्टेंबर ते ते रविवार २४ सप्टेंबर सकाळी ९.३० ते रात्री ८.३० पर्यंत सुरू राहील.
२०१० पासुन वायुसेना अधिकारी आणि सॉफ्टवेअर आर्किटेक्ट अश्या दोन बहीणी ह्यासाठी कार्य करत आहेत. ह्या दोघी संपूर्ण भारतातील घरगुती फर्निचर तयार करणारे आणि विणकाम, हाताने भरतकाम करणार्या गरजू कलाकारांच्या गटांसाठी कार्यरत आहेत. हातमाग, हस्तकला, हस्त-भरतकाम यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच छोट्या-छोट्या खेड्यांतील गरीब व गरजू मात्र कलेने समृद्ध अशा लोकांच्या हाताला काम मिळवून द्यावे हा ह्या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
त्याचसोबत बदलत्या काळात लोप पावत चाललेली भारताची ही अद्वितीय कला टिकवून ठेवण्याचे हॅन्ड्स ऑफ इंडियाचे प्रयत्न आहेत. आज यंत्रणेच्या मोठ्या वापरामुळे हस्तकला हळूहळू लोप पावत चालल्या आहे ह्या कलांना टिकवुन ठेवण्याचे कार्य हॅन्ड्स अॉफ इंडिया करतो.
हॅन्ड्स अॉफ इंडियामध्ये १० प्रकारच्या हाताने केलेले भरतकाम पहावयास मिळते ज्यामध्ये पंजाबमधील फुलकारी, चिकण, उत्तर प्रदेशातील पत्तीवर्क आणि आरी, पश्चिम बंगालमधील कांथा आणि इंग्लीश कढ़ाई, बिहारमधील सुजनी, कश्मीरची सुझनी व कर्नाटकाची कसुटी आसेल.
हे प्रदर्शन २१ सप्टेंबर २०१७ पासून सुरू होईल आणि २४ सप्टेंबर २०१७ पर्यंत राहील. हे टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, सदाशिव पेठ पुणे येथे होईल.