हडपसर मध्ये होणार काय ?
पुणे-हडपसर विधानसभा मतदार संघाकडे यावेळी अनेकांचे लक्ष लागून आहे . भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर इथे मोदी लाटेत गेल्यावेळी विजयी झाले. नगरसेवक असलेल्या टिळेकर यांनी आमदार झाल्यानंतर कसा कारभार केला याची जंत्री खुद्द हडपसर मतदार संघातून चर्चिली जाते. माहिती अधिकार कार्यकर्ते रवी बराटे आणि मनसे चे इच्छुक उमेदवार असेलेले वसंत मोरे यांनी टिळेकर यांचे कारनामे चव्हाट्यावर मांडले ,जरी टिळेकर यांनी ते नाकारले असले तरी या सर्वाबाबत पक्षाने त्यांना दिलेले अभय लपून राहिलेले नाही .याहून काही किस्से येथील भाजपचे च नगरसेवक सांगता आहेत . खुद्द माळी समाजात देखील त्यांच्याबाबत नाराजी आहे .
हडपसर म्हटले कि माळी आणि मराठा अशा दोन समाजातील नेत्यांची आपसात नेहमी स्पर्धा दिसलीआहे . आता वैशाली बनकर यांना राष्ट्रवादी उमेदवारी देणार अशी अफवा कोणी पेरली आहे ? असा सवाल राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याला याबाबत विचारणा केली असता करण्यात आला आहे. पक्षाने त्यांना महापौर पद दिलेले आहे , त्याचा वापर त्यांनी कसा केला ? स्वतःच्या नातेवाईकांना हि ओळख न देणाऱ्या महापौर म्हणून माळी समाजातच त्यांचा उल्लेख केला गेला . कॉंग्रेस मध्ये दत्ता बनकर यांचा स्वभाव, आता या पती पत्नीचा स्वभाव यात जमीन असमान चा फरक असल्याचे माळी समाजातीलच लोक बोलत असल्याचे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते जाणून आहेत . त्यामुळे माळी समाजातील टिळेकर आणि बनकर या दोघांचा ,ते इच्छुक असले तरी ,त्यांचा आपापल्या पक्षात उमेदवारी रेस मध्ये समावेश होईल असे चित्र सध्या तरी नसेल असा जाणकारांचा व्होरा आहे.
भाजपच्या टिळेकर यांचे कारनामे पाहूनच एकीकडे बदनामी नको म्हणून पक्षाने टिळेकर यांना आजतागायत अभय देत आता हडपसर मतदार संघ शिवसेनेला सोडण्याचा निर्धार पक्षाने केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे . आणि सेनेकडून इथे विधानसभे साठी नाना भानगिरे सारखा लढवय्या उमेदवार असू शकतो यावर अनेकांचे एकमत होते आहे. महापालिकेत उपमहापौर पद भूषविलेल्या महादेव बाबर यांना आमदार कि ची संधी पूर्वी देण्यात आली होती .ते माजी आमदार आहेत .ते यावेळी देखील आमदारकी साठी इच्छुक आहेत . पण त्यांच्या ऐवजी नगरसेवक असलेले नाना भानगिरे विधानसभा निवडणुकीत यशाचा रथ सक्षम पणे खेचू शकतील असा विश्वास सेनेच्याच गटातून केला जातोय . मनसे चे तर वसंत मोरे हे येथील प्रबळ आणि निश्चित असे उमेदवार मानले जातात .त्यांच्या कार्यकर्त्यांचा येथे मोठा समूह आहे. राहता राहतो तो राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील उमेदवाराचा प्रश्न . कॉंग्रेस ने जरी येथून उमेदवारी मागितली तरी शिवरकर यांना त्यात यश येईल असे दिसत नाही. माळी समाजातील नेते पदे मिळताच समाजाला हि विसरतात हा हडपसर चा अनुभव कॉंग्रेस च्या गटात हि चर्चिला जातो .एकंदरीत हडपसर राष्ट्रवादीकडे राहील आणि यावेळी राष्ट्रवादीने हडपसर ला शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून खासदारच माळी समाजाचा अमोल कोल्हे यांच्या रूपाने दिला आहे .आणि हडपसरच्या माळी समाजाला राष्ट्रवादी कडेच कायम ठेवण्यासाठी विधानसभेच्या प्रचार यंत्रणेत अमोल कोल्हे यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी देवूनच येथील निवडणूक लढविली जाईल असे दिसते आहे.तरीही माळी समाजातील उमेदवार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी च्या गोटातून झाला तर मग योगेश ससाणे शर्यतीत पुढे राहतील असे दिसते आहे . पण या पक्षात उमेदवारी साठी खरी चुरस प्रशांत जगताप आणि चेतन तुपे पाटील यांच्यात राहील असे दिसते आहे . दोघे हि महापालिकेच्या राजकारणातील तगडे नेते आहेत . चेतन पाटलांचे वडील दिवंगत विठ्ठल पाटील यांना मानणारा वर्ग अजून हि आहे . आणि प्रशांत जगताप यांना महापौर पद दिलेले आहे तसे चेतन पाटलांना विरोधी पक्षनेते , आणि आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पद हि दिलेले आहे. पण गेल्या ५ वर्षात भाजपचा येथे आमदार झाल्याने ,तत्पूर्वी शिवसेनाचा आमदार असल्याने कॉंग्रेसच्या ताब्यातून गेलेला हा मतदार संघ आता राष्ट्रवादी खेचून आणणार आहे असा विश्वास पक्षातील जाणकारांना असल्याने या पक्षात उमेदवारी साठी चुरस आहे ज्यात पहिले नाव म्हणजे सर्वात वरच्या क्रमांकावर चेतन पाटलांचे नाव, तर दुसऱ्या क्रमांकावर प्रशांत जगतापाचे नाव घेतले जाते. आणि त्यानंतर 3 नावे तिसऱ्या क्रमांकावर आहेत ,त्यातले एक म्हणजे नगरसेवक योगेश ससाणे यांचे नाव घेतले जाते .आणि हडपसर मध्ये एकमत होणार नसेल तर कात्रजचे प्रकाश कदम यांना यावेळी संधी द्या ,ते चांगली लढत देवू शकतात असे सांगत ससाणे यांच्या बरोबरीने कदम आणि नगरसेवक बंडू गायकवाड यांचाही शर्यतीत तिसरा क्रमांक सध्या तरी लागतो आहे.
म्हणजे सध्याच्या स्थितीत सांगायचे झाले तर शिवसेनेचे नाना भानगिरे , मनसे चे वसंत मोरे आणि राष्ट्रवादी चे चेतन तुपे यांच्यात हडपसर विधानसभेचा रणसंग्राम होईल असे सध्या तरी चित्र आहे.