पुणे-येत्या शनिवारी 10 गावांचे ग्रामस्थ,सरपंच यांच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती येथे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली .
16 फेब्रुवारी रोजी ,सकाळी साडेदहा वाजता मुंबई बेंगलोर महामार्गावरील बाणेर येथील मर्चिडीस शो रूम शेजारील बंटारा भवन मध्ये हा सोहळा होणार आहे. सुस,हिंजेवडी,माण, म्हाळुंगे ,बाणेर ,बालेवाडी,पाषाण ,सुतारवाडी ,सोमेश्वर वाडी येथील ग्रामस्थ आणि सरपंच यांच्या वतीने होणाऱ्या या समारंभास सकाळ पेपर्स चे अध्यक्ष प्रतापराव पवार ,तसेच माजी खासदार नानासाहेब नवले,हभप वाणीभूषण चंद्रकांत महाराज वांजळे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत .शंकरभाऊ मांडेकर ,पांडुरंग ओझरकर ,कोमाल्ताई साखरे,स्मिताताई जांभूळकर ,स्मिताताई भोसले,बाळासाहेब रानवडे ,अपुर्वाताई निकाळजे ,मयूर भांडे,,राहुल जांभूळकर,पांडुरंग पाडाळे,गजानन चांदेरे,सपनाताई वाडकर ,कविताताई माकर,तर नगरसेवक अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरे ,स्वप्नाली सायकर ,ज्योतीताई कळमकर हे या साम्राम्भाचे निमंत्रक आहेत .