पुणे-पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्वाचे असल्याचे प्रतिपादन रांका ज्वेलर्सचे व्यस्थापकीय संचालक फत्तेचंद रांका यांनी केले . स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये नवीन उद्योजकामध्ये नवीन कौशल्य घडविण्यासाठी टिळक रोडवरील स. प. महाविद्यालयातर्फे मेवेन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . यशस्वी उदयोगाची गुरुकिल्ली या विषयावर रांका ज्वेलर्सचे संचालक फत्तेचंद रांका त्याचे अनुभव कथन केले . फत्तेचंद रांका यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि , विद्यार्थ्यांनी आपले करिअर करत असताना व्यवसाय , नोकरी तसेच पारंपरिक व्यवसाय करतात , तर काही द्विधा मनस्थितीत असतात , यामध्ये विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे कि , या जगात आपण सर्व काही मिळवू शकतो परंतु आपला आत्मविश्वास घालवू नका . त्यासाठी आपले करिअर डिझाईन करा . आयुष्यात ध्येय ठेवून करिअर करा . त्यासाठी नियोजन करा . मी उंच शिखरावर जाणार त्यासाठी मी माझा विचार बदलणार , त्यातून माझे जीवन बदलणार . जे काही करायचे आहे , ते इच्छाशक्ती ठेवून काम करा . त्यातून झपाटून जीव ओतून काम करा . इच्छाशक्ती हि जीवनात इंधनासारखी आहे , ती तुम्हाला आयुष्यभर खादय पुरणारी आहे . व्यवसाय करताना चिकाटीने आणि प्रामाणिकपणे करा . ते करत असताना अनेक संकटे येतील ती संकटे तुमची परीक्षा घेतील परंतु तुम्ही न डगमगता संकटाना सामोरे जा . टीमवर्कने काम करा . , वेळेची शिस्त पाला व्यवसाय करत असताना , त्या शहराची गरज , तेथील लोकांच्या जीवनमानाला अनुकूल व्यवसाय आहे का ? हे ओळखून व्यवसाय करा . तसेच परिस्थितीप्रमाणे बदलत राहा , तसा , तुमचा व्यवसायाचा देखील विस्तार होईल . त्यासाठी आपण बदल करण्यास शिकले पाहिजे . लोकांचा संपर्क वाढवा , त्यांच्या मागण्या पहा , लोकांच्या तक्रारिचे विश्लेषण करा . त्यांचा फीडबॅक घ्या ,तर तुम्ही व्यवसायात उत्तमप्रकारे पुढे जाऊ शकाल . त्यातून बिझनेस सिस्टीम डेव्हलपमेंट करा . बिझनेस मी स्वतःच करणार , सगळेच मीच पाहणार या मानसिकेतेमुळे तुम्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकणार नाही . व्यवसायात योग्य तो नफा कमवा , लोकांची सेवा करून व्यवसाय करा हे तत्व पाळून व्यवसाय करा . आजचे काम आजच करा , लोकांशी चांगले बोला , त्यांचा आदर करा , लोकांना तुमच्याविषयी आदर वाटेल . व्यवसायात ताबडतोब पैसा पाहिजे , ग्राहकाला फसविणार , हलका माल देऊन जास्त पैसा कमविणार, यातून ताबडतोब श्रीमंत होणे धोक्याचे आहे . कासवाच्यागतीने श्रीमंत व्हा . बिझनेस वाढवा , नफा वाढवा , त्यातून रोटेशन व टर्नओव्हर देखील वाढेल . नक्कीच नफा प्राप्त होईल . तुम्ही डिग्री मिळविली म्हणजे सर्व काही मिळविली असे समजू नका कारण पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्वाचे आहे .
त्यानंतर जे. आर. डी. प्रिंटपॅक प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका जान्हवी धारिवाल हे ” कौटूंबिक व्यवसाय जतन व वाटचाल ” या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले कि ,व्यवसाय करताना अनेकांना अनुभवाची शिदोरी घेऊन अनेक संकटे पार केली . माझ्या आई बाबांनी देखील मार्गदर्शन केले , त्यातून माझा आत्मविश्वास वाढला . व्यवसाय करत असताना तो प्रामाणिक व सचोटीने करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांनी पाहुण्यांचे स्मृतिचिन्ह देउन सन्मानित केले . यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अशोक मोरवाल , उपप्राचार्य शामराव थोरात , वाणिज्य विभागाच्या प्रमुख व मेवेनच्या मुख्य संयोजक डॉ. सरोज हिरेमठ , मेवेनचे समन्वयक आदेश बिडकर , सप्रेम स . प. माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव सचिन मेहता व अन्य मान्यवर उपस्थित होते .
त्यानंतर ए. के. स्टुडिओचे संचालक केदार आठवले हे ध्वनी मुद्रण या विषयावर मार्गदर्शन केले . दुपारच्या सत्रात करिअर वाटांचा शोध व कौशल्य विकास या विषयावरील चर्चासत्रामध्ये आय. एफ. सी. बी. ए.चे अध्यक्ष शंतनू भडकमकर , एस. ए. व्ही. केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक अंकिता श्रॉफ , पर्पल चायचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली शर्मा , रेड एफ एम पुणे कार्यक्रम अधिकारी सोनिया पाठक चव्हाण , थॉटवर्क्सचे सुनील मुंद्रा आदी मान्यवर सहभागी झाले होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत स. प. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या प्रमुख व मेवेनच्या मुख्य संयोजक डॉ. सरोज हिरेमठ यांनी केले तर सूत्रसंचालन रोहित बिजलानी केले तर आभार रुचिता ओसवाल यांनी मानले .