एम. ए. रंगुनवाला महाविद्यालयाला ‘सेव्हन-ए-साईड’ फुटबॉल स्पर्धेत विजेते पद
पुणे:
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘एम. ए. रंगुनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’च्या वतीने आयोजित आठव्या ‘सेव्हन-ए-साईड’ फुटबॉल स्पर्धेमध्ये एम.ए.रंगूनवाला महविद्यालय विजयी झाले आहे. महाविद्यालयाने सलग तीनवर्षे ही स्पर्धा जिंकून ‘हॅट्रीक’चा विक्रम केला आहे, अशी माहिती एम. ए. रंगुनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’च्या प्राचार्य अनिता फ्रान्झ यांनी दिली.
आझम कॅम्पस मैदानावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना ‘एम. ए. रंगुनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’ आणि ‘रेवाचंद भोजवानी ज्युनिअर कॉलेज’ यांच्यात झाला. एम. ए. रंगूनवाला महाविद्यालयाने सामना 4-0 ने जिंकला.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी.ए.इनामदार आणि एम. ए. रंगुनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’च्या प्राचार्य अनिता फ्रान्झ यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
स्पर्धेत 12 संघ सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये शारिरीक क्षमता विकसित करणे, स्वत:मधील आत्मविश्वास वाढविण्यास मदत होणे या प्रमुख हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले जाते, असे प्राचार्य अनिता फ्रान्झ यांनी सांगितले.