पुणे-अतिरिक्त आयुक्तांना महापौर दालनात झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात अटकपूर्व जामिन मिळविलेले कॉंग्रेस पक्षाचे महापालिकेतील गट नेते अरविंद शिंदे यांनी .. महापौर दालनात घडलेली घटना समर्थनीय नाहीच .. असे म्हटले आहे मात्र चूक कोणाची हे लक्षात घेतले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे .
महापौर कार्यालयात जे काही घडले ते अनवधानाने घडले असे सांगत ते म्हणाले महापालिकेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरु आहे त्याचा आवाज उठविण्यासाठी आम्ही माध्यमांकडे जाणे ,मुख्य सभेत आवाज उठवणे आणि आंदोलने करत आलो आहोत .अनेक प्रकरणातील भ्रष्टाचारावर आम्ही आवाज उठविला आहे. आयुक्तांना त्या दिवशी आम्ही सकाळीच जलपर्णी बाबतच्या गैरप्रकाराबाबत निवेदन दिले होते.त्यास दाद मिळेना म्हणून आम्ही महापौर दालनात ठिय्या मांडला यावेळी आम्ही अतिरिक्त आयुक्तांवरच आमचा आक्षेप आहे त्यांना बोलावू नका असे सांगितले होते तरीही ते तिथे आले. आणि आपली बाजू महापौरांपुढे विशद करू लागले. यावेळी आमच्यातील एक नगरसेवक , म्हणाला चोऱ्या तुमच्याच खात्यातून होतात …तुम्ही काय खुलासा देतात ..त्यावेळी त्यांची प्रतिक्रीया होती तुमच्या लोकांची लायकी आहे का माझ्यावर आक्षेप घेण्याची … र मी त्यावर उठून प्रश्न केला तुम्ही आमची लायकी काढणारे कोण ?आणि गोंधळ झाला . त्यात आम्हालाही अतिरिक्त आयुक्तांच्या सुरक्षा रक्षकांकडून ढकलेले गेले .
यापूर्वी अतिक्रमण खात्याच्या एका अधिकाऱ्याला कार्यालयात मारहाण झाली होती तेव्हा मी मुख्य सभेत आवाज उठविला होता , उलट त्या अधिकाऱ्यावरच गुन्हा दाखल केला गेला. सभागृह नेत्यासह अन्य कार्यालये फोडली गेल्याची घटना महापालिकेत घडली तेव्हा देखील अशी पोलीस कारवाई करण्यात आली नाही . आणि आता महापौर दालनात झालेली घटना अनवधानाने झाली असताना मध्यरात्री नंतर पोलिसांचा मोठा ताफा आमच्या घरी येतो आणि आम्हाला त्यास तोंड द्यावे लागते याला काय म्हणावे ,महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा जरूर हक्क आहे पण त्यांनी भ्रष्ट कारस्थानांना पाठीशी घालू नये असेही आवाहन त्यांनी केले . पहा आणि ऐका नेमके अरविंद शिंदे यांनी नेमके काय म्हटले आहे त्यांच्याच तोंडून …..