पुणे- लोकसभा निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व बाजूंची व्यापक माहिती देणा-या ‘लोकराज्य’च्या निवडणूक विशेषांकाचे प्रकाशन आज झाले. जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीच्या (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्ड मॉनिटरींग कमिटी- एमसीएमसी) समन्वय अधिकारी तथा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक नंदिनी आवडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा समन्वयक सुधीर जोशी, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक महेश अय्यंगार, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, दूरदर्शनचे कार्यक्रम प्रमुख संजय कर्णिक, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी जगदीश राव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. योगेश बोराटे,सोशल मिडिीयाच्या पोलीस उप निरीक्षक श्यामल पोवार, अविनाश लोहर, टी.पी.शर्मा, एस.बी.निकम, सदस्य-सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पुणे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय मोरे,सहायक संचालक वृषाली पाटील आदी उपस्थित होते.
लोकराज्यच्या विशेषांकामध्ये लोकसभा निवडणूक 2009 आणि 2014 ची आकडेवारी, सी-व्हीजील अॅप, मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगामार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या विविध सुविधा, निवडणूक प्रशिक्षण, समाजमाध्यमांचा वापर, पेड न्यूज, आदर्श आचार संहिता, निवडणुकांचे बदलते तंत्र याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली आहे. हा अंक संग्रहणीय असून सर्वांना उपयोगी पडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.