पुणे : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरिय समन्वय समितीची बैठक, समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकित तंबाखू नियंत्रण कायदा व महत्वाची कलमे, तंबाखूचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, समिती सदस्यांच्या जबाबदाऱ्या, तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी आदि विषयांवर चर्चा करण्यात आली. तंबाखू नियंत्रण कायद्यातील तरतूदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी यावेळी दिले.
या बैठकिस आरोग्य विभागाचे उपसंचालक एच.एच चौहान, जिल्हा शल्यचिकित्सक आर.के शेळके, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन एस.पी.शिंदे, कृषी विकास अधिकारी सुनिल खैरनार, कृषिअधिकारी तुषार तांदळे, पिंपरी-चिंचवड मनपा आरोग्य विभागाचे डॉ.नरेंद्र ठाकूर, महिला दक्षता समितीच्या सदस्या ज्योती ढमाळ, पंचायत समिती सदस्य शिरुर मच्छिंद्र गदादे, फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रकाश पवार, डॉ. यशवंत इंगळे आदि उपस्थित होते.