भाऊ गलांडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन
पुणे – ज्यूट वस्तूंच्या वापरामुळे लघु उद्योजक तसेच शेतकऱ्यांना रोजगार मिळण्यास मदत होते, ज्यूट वस्तु निर्मितीमध्ये महिला उद्योजकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे,त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी नॅशनल ज्यूट बोर्डातर्फे आयोजित प्रदर्शनास भेट देणे गरजेचे आहे,असे आवाहन उप विभागीय अधिकारी भाऊ गलांडे यांनी केले. येथील टिळक स्मारक मंदिरात नॅशनल ज्यूट बोर्डातर्फे ज्यूट पासून निर्मिती केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन भाऊ गलांडे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.
ज्यूट पासून बनवलेल्या वस्तू अत्यंत आकर्षक व स्वस्त दरात या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. भारतातल्या विविध राज्यांतून आलेल्या विक्रेत्यांनी या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स लावलेले आहेत. यामध्ये ज्यूट पासून बनवलेली तावदाने,पादत्राणे,भेटवस्तू,कॅरी बॅग्स अशा वस्तूंचा समावेश आहे. दि. १८ ते २३ जानेवारी 2017 या कालावधीत सकाळी १०.३० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत सुरु राहणाऱ्या ज्यूट प्रदर्शनाला अधिकाधिक नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन नॅशनल ज्यूट बोर्डचे जाहिरात अधिकारी बी. नर्सिमुलू यांनी केले आहे.