मुंबई-होय, मुंबईतला तुमचा आमचा अक्की -अभिनेता राजेश खन्ना चा जावई आणि अभिनेता अक्षयकुमारची लोकप्रियता सर्वदूर आणि विख्यात आहेच. पण याच त्याच्या लोकप्रियतेमुळे दिल्लीतल्या एका फॅशन उद्योजक मात्र एक आगळा वेगळा सुखद अनुभव अनुभवतो आहे. अर्थात तो अभिनेता अक्षयकुमार नाही तर तो आहे एक फॅशन उद्योजक… पण तो कधी कुठे पार्टीत गेला ..कार मधून निघाला कि त्याची झलक पाहून कित्येकदा लोकं लगेच प्रभावित होतात आणि अरे अक्षयकुमार … असे उद्गार बाहेर पडतात .. आणि कधी काही हौशी मागे धावून पाहण्याचा यत्न करतात . काहींनी तर सर एक फोटो प्लीज असे म्हणून त्याच्या समवेत फोटो हि घेतले आहेत .पण हा अक्षयकुमार अगदी तारुण्यातील अक्षयकुमार भासतो ज्याचे खरे नाव आहे अजय राजपाल
असा समज आहे कि जगात सात लोकं एक सारखी दिसतात आणि या कल्पनेचे समर्थन करण्यासाठी हे उदाहरण काही लोकं आता देवू लागले आहेत दिल्लीतील एक फॅशन उद्योजक अजय राजपाल आहे. अनेकदा त्याची तुलना अभिनेता अक्षय कुमार, बरोबर करताना दिसतात. काही आठवडे आधी तो एका फॅशन शोला उपस्थित होता आणि तेथील काही डिझाइनर नी देखील कॉम्प्लिमेंट दिली कि तो अक्षरशः अक्षय कुमार दिसतो. अजय राजपाल ला मात्र खूप अभिमान वाटतो कि लोकं त्याची तुलना बॉलिवूड सुपर स्टार अक्की (अक्षय कुमार) बरोबर करतात……