बळीराजा गौरव मिरवणूक संपन्न
पुणे-सालाबादप्रमाने बळीराजा गौरव मिरवणूकीचे आयोजन सत्यशोधक प्रबोधन महासभा, विश्वसम्राट बळीराजा गौरव समिती व शेतकरी सभा यांच्या वतीने करण्यात आले होते. महात्मा फुलेवाडा ते लाल महाल अशी मिरवणूक अतिशय उत्सवाच्या वातावरणात पार पडली. गेली पंधरा वर्षे बळीराजा मिरवणूकीचा हा उपक्रम सातत्याने चालू आहे. कष्टकर्यांचे जेष्ठ नेते डाॅ. बाबा आढाव, प्रा. प्रतिमा परदेशी,अंकल सोनवणे, रमेश राक्षे,सचिन बगाडे , लोंढे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बळीराजा मिरवणूकीला महात्मा फुलेवाड्यावरून सुरूवात होऊन लालमहालाकडे मार्गस्थ झाली. मिरवणूकीच्या मार्गावर विविध ठिकाणी अनेक संस्था, संघटनांनी बळीराजाचं स्वागत व गौरव करण्यात आला.यावेळी बळीराजाच्यावतीने कृषीधनाचे वाटप करण्यात आले व असे सुगीचे दिवस येणार आहेत असा विश्वास लोकांच्यामध्ये या मिरवणूकीच्या निमित्ताने निर्माण करण्यात आला. यावेळी बळीराजाच्या वेषात समता परिषदेचे प्रा. रघुनाथ ढोक होते. या मिरवणुकीचे वैशिष्टय म्हणजे विविध राजकीय, सामाजिक संस्था,संघटनांचे कार्यकर्त्यांचा सहभाग सहभाग या मिरवणुकीत होता. यांत प्रामुख्याने भारिप बहुजन महासंघांचे पुणे शहर अध्यक्ष अतुल बहुले, भारिप पुणे जिल्हा(पश्चिम) चे उत्तम वनशिव, शहर व जिल्हा कार्यकारणीचे सदस्य राॅबिन सॅमुअल,अजित पानसरे, नवनीत अहिरे, संदिप चौधरी , संजय गायकवाड, माजी अध्यक्ष ॲड. किरण कदम .राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रल्हाद वडगांवकर,संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, वारसा फाउंडेशनच्या प्राची दुधाने, भारतीय बौध्द महासभेच्या अानिताताई चव्हाण, रामलिंग टेकाळे ,
प्रबुध्द भारत पाक्षिकाचे विलास टेकाळे , आनिता टेकाळे , संजय धावारे.सुनीता भगत
बळीराजा गौरव समितीचे रोहिदास तोडकर, प्रतिक परदेशी, आकाश ढोक,वामन वळवी,आप्पाराव चव्हाण, महेश बनकर,अर्चना झेंडे, रवि झेंडे.इ. अनेक मान्यवर कार्यकर्ते या मिरवणुकीत सामील झाले होते. ही मिरवणुक लाल महाल येथे आल्यानंतर राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला हार अर्पण करून ॲड मोहन वाडेकर व प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या मार्गदर्शनपर भाषणांनंतर संपली.