भगवानदादावरील ‘एक अलबेला ‘ नंतर मंगेश देसाई आता चक्क देवदास रंगविणार आहे . के. एल. सैगल, दिलीपकुमार आणि शाहरूख खानने आपल्या अभिनयाने रंगवलेला देवदास हा सिनेमा आता मराठीत येणार आहे. विविध भाषांमध्ये आतापर्यंत 16 वेळा ही साहित्यकृती मोठ्या पडद्यावर दिसली आहे. मात्र पहिल्यांदाच ही कलाकृती मराठीत दिसणार आहे.
ज्येष्ठ बंगाली साहित्यिक शरतचंद्र चॅटर्जी यांच्या गाजलेली ‘देवदास’ ही कादंबरी. मराठीतील प्रख्यात अभिनेता मंगेश देसाई देवदासच्या मुख्य व्यक्तिरेखेत दिसणार असल्याची माहिती आहे. चंद्रमुखी आणि पारोच्या भूमिकांसाठी अभिनेत्रींचा शोध सुरु आहे. मंगळवारी या चित्रपटाचा पहिला टीझर लाँच होणार आहे. ऋतुराज धालगडेने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे.दिग्दर्शक ऋतुराज धालगडे म्हणाला की, देवदास हा एक माइलस्टोन आहे. भारतातल्या १६ भाषांत तो बनला आहे. पण मराठीमध्ये तो सिनेमा झालेला नाही. प्रेम, विरह आणि वेदना याचे अनेक पदर या सिनेमात आहेत. जे आजही आपले वाटतात. म्हणून देवदास करण्याचा निर्णय घेतला. तसेच सिनेमातल्या चंद्रमुखी, पारो यांच्याबाबत मात्र अद्याप काही विचार झालेला नाही. हा देवदास साकारताना नव्वदच्या दशकाचा काळ घेण्यात येणार आहे
भगवानदादांवर आधारित ‘एक अलबेला’ चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेमुळे मंगेशवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. त्यानंतर पुन्हा त्याच्या वाट्याला महत्त्वाची भूमिका येत आहे.ऋतुराज धालगडेचा हा तिसरा सिनेमा. टिन एजरची लव्हस्टोरी मांडलेला ‘स्लॅमबुक’ नंतर आता ऋतुराजचा दुसरा सिनेमा ‘लॉस्ट अॅण्ड फाऊंड’ उद्या प्रदर्शित होत आहे. तसेच अभिनेता मंगेश देसाईचा नुकताच भगवान दादांवर आधारित ‘एक अलबेला’ हा सिनेमा गाजला. या सिनेमात मंगेश देसाईने बॉलिवूड डर्टी गर्ल विद्या बालनसोबत स्क्रिन शेअर केली आहे. ‘बाबुजीने कहा गाँव छोड दो, सब ने कहा पारो को छोड दो, पारोने कहा शराब छोड दो’, ‘कौन कम्बख्त बरदाश्त करने के लिये पिता है’ यासारखे जबरदस्त संवाद असलेला शाहरुखचा देवदास प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेला होता. आता ही तगडी डायलॉगबाजी मंगेश देसाई च्या तोंडून मराठीत ऐकायला मिळण्याची संधी आहे.