पुणे- अलबेला नंतर मंगेश देसाई करीत असलेल्या ‘देवदास ‘ या चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे . अर्थात मंगेश जरी देवदास ची भूमिका करीत असला तरी अद्याप चंद्रमुखी आणि पारोच्या भूमिकांसाठी अभिनेत्रींचा शोध सुरु आहे.मराठीतल्या या देवदास चे दिग्दर्शक ऋतुराज धालगडे यांचे म्हणणे आहे कि देवदास हा एक माइलस्टोन आहे. भारतातल्या १६ भाषांत तो बनला आहे. पण मराठीमध्ये तो सिनेमा झालेला नाही. प्रेम, विरह आणि वेदना याचे अनेक पदर या सिनेमात आहेत. जे आजही आपले वाटतात. म्हणून देवदास करण्याचा निर्णय घेतला. तसेच सिनेमातल्या चंद्रमुखी, पारो यांच्याबाबत मात्र अद्याप काही विचार झालेला नाही. हा देवदास साकारताना नव्वदच्या दशकाचा काळ घेण्यात येणार आहे…
पहा हा मराठी देवदास चा पहिला टीझर ….