धनकवडी :- तुतारी , हलगी , भगवे झेंडे घेऊन पारंपरिक वेश धारण करून अकरा महाविद्यालयातील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सिद्धीविनायक ग्रुपने किल्ले सिंहगड ते कात्रज प्रज्वलित मशाल दौड , शिवाज महाराजांच्या प्रतिमेचे पूजन , भव्य मिरवणूक , आरोग्य तपासणी शिबीर , वृक्षारोपण , अनाथाश्रम मध्ये खाऊ वाटप अशा वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करीत शिव जयंती उत्साहात साजरी केली. तर प्रा. फुलचंद चाटे यांच्या हस्तेयावेळी आरोग्य शिबिराचे उद्घाटन करून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली सायंकाळी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले , अभिनव एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगतात , चाटे शिक्षण समुहाचे विभागिय संचालक फुलचंद चाटे , डाँ. वैभव ताड यांच्या उपस्थित भव्य मिरवणूकीला सुरुवात झाली. यामध्ये ढोल ताशांचा गजर , तुतारी , सनई चौघड्यांचे स्वर शिवाजी महाराजांचा जयजयकार होत होता. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान , उपस्थित मान्यवरांचे स्वागत , पारंपरिक वेश धारण केलेली तरुण - तरुणी मिरवणुकीची शोभा वाढवत होते. शिवाजी महाराजांचा वेशातील कलाकार नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. महाराजांना मुजरा करण्यासाठी चिमुकल्यांसह ज्येष्ठांनीही गर्दी केली होती. सिंहगड किल्याची स्वच्छता , दिंडीतील वारकऱ्यांना मदत , ममता फौंडेशन मधील एचआयव्ही ग्रस्त मुलांसोबत वाळी व वाढदिवस साजरा , वृक्षारोपण , पर्यावरण जतन अशी सामाजिक कामे सिद्धीविनायक ग्रुप अनेक वर्षे करीत आहेत.पद्मनाभ ढोल पथक आणि महिलांच्या हस्ते पुजा हे या मिरवणूकीचे मुख्य आकर्षण होते अँड. दिलीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोख्या व पारंपरिक शिवजयंती उत्सव संपन्न झाला.