पिंपरी -गोयल गंगा इंटरनैशनल स्कुल वार्षिक स्नेहसंमेलन ‘कलामंथन २०१७’ उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी सामजिक प्रबोधन करणारी नाटके व नृत्य कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल, अतुल गोयल, स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता,मुख्याध्यापिका भारती भागवाणी उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गद
यावेळी गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल म्हणाले कि, या कार्यक्रमाचा उद्देश फक्त आनंद लुटण्याचा नसून त्यातून सामाजिक मूल्ये, बौद्धिक कल्पकता, कौशल्ये,स्वत:मधील कलागुण जोपासण्याचा देखील आहे. त्यापुढच्या आयुष्यात सुद्धा भरपूर मेहनत घेवून आपले आणि या देशाचे भविष्य उज्ज्वल करा कारण परिश्रमांना पर्याय नाही सल्ला असा त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रबळ इच्छाशक्ती आणि काहीतरी वेगळे करून दाखवण्याची आवड असल्यास माणूस काहीही करून दाखवू शकतो अशी भावना सिद्धार्थ शिरोळे यांनी बोलून दाखवली.