पुणे :- श्री. बाबा गंगाराम सेवा समितीच्या वतीने ‘श्री बाबा गंगाराम जयंती’ उत्साहात अल्पबचत भवन येथे साजरी करण्यात आली. यावेळी समितीच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘भक्ती के रंग, बाबाजी के संग’ या विशेष भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमात जयपूर येथील निशा दत्त आणि गोविंद शर्मा तसेच बिकानेरचे भजन गायक प्रवेश शर्मा श्री बाबा गंगाराम यांच्या विविध सुमधुर भजनांचे सादरीकरण केले. सांसो में तेरा ही नाम…,बाबा श्री गंगाराम हरवक्त तेरा गुणगान अशा विविध गीतांनी उपस्थितांनी विशेष दाद मिळाली.
या कार्यक्रमावेळी चालीसा पठण, भजन संध्या, महाआरती अशा विविध कार्यक्रमांचा अनेकांनी लाभ घेतला.
यावेळी ईश्वरचंद्र गोयल, तोलाराम चौधरी,राजकुमार अग्रवाल, जगदीश अग्रवाल,विजय अग्रवाल, अमिता अग्रवाल,शाम अग्रवाल,शाम भुतडा,मुकेश कनोडिया,बालकिरण बजाज,अखिल अग्रवाल,विजयालक्ष्मी अग्रवाल,प्रदीप राठी,अशोक सिंघल यांच्यासह विविध समाजातील बाबा गंगाराम यांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबा गंगाराम यांनी समाजातील अगणित लोकांना जीवनाचा योग्य मार्ग दाखविला. आजही विष्णूचे अवतार मानले जाणाऱ्या बाबा गंगाराम यांच्या जयंतीनिमित्त अनेक भक्त राजस्थान येथील पंचदेव मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.बाबा गंगाराम यांच्या कार्याचा प्रचार करण्याच्या हेतूने श्री बाबा गंगाराम सेवा समिती स्थापना करण्यात आली असून गेली अनेक वर्ष बाबांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम समितीतर्फे राबविले जातात.