पुणे :- पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल मध्ये काल अनोख्या पद्धतीने बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी नाटक, गाणी आणि वेगवेगळ्या नृत्यांमध्ये सहभागी होऊन त्यांचे मनोरंजन केले.यावेळी गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या संचालिका सोनू गुप्ता, शाळेच्या मुख्याध्यापिका भारती भागवाणी, इतर शिक्षक,पालकही उपस्थित होते.
आपण प्रत्येकवेळी म्हणतो लहानांनी मोठ्यांकडून शिकावे पण आजच्या या बालदिनानिमित्त मला असे सांगावेसे वाटते कि मोठ्यांनी लहानांकडून शिकावे कि, निरागसता, मनात येईल ते निसंकोचपणे सांगण्याची क्षमता तसेच चुका कबूल करण्याची मानसिकता या गोष्टी ज्या मोठ्या झाल्यानंतर आपण सहजपणे विसरतो त्या लहान मुलांकडून शिकल्या आणि अंगीकारल्या पाहिजेत. लहान मूल त्याला मारलेला फटकाही अगदी सहजपणे विसरून जातं तसंच आपणही उगीचच जपलेले अहंकार विसरून पुढे गेले पाहिजे,अशा भावना सोनू गुप्ता यांनी व्यक्त केल्या .प्रत्येक व्यक्तीमध्ये एक निष्पाप, लहान, खेळकर मूल लपलेलं असतं.उगाचच प्रौढपणाचा उहापोह न करता आपल्या मधल्या खोडकर, निष्पाप आणि गोंडस छोट्या मुलाला प्रत्येकाने जागं ठेवलं पाहिजे.भरभरून जगा,आयुष्याचा खरा आनंद केवळ एखादं लहान,निष्पाप मुलंच घेऊ शकते त्यामुळे आयुष्य लहान मुलांसारखं प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत आणि तणावमुक्त जगा अशा भावना भारती भागवाणी यांनी मांडल्या.