पुणे :- क्रेडाई – महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी शांतीलाल कटारिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. क्रेडाई – महाराष्ट्रची निवडणूक आज नाशिक येथे झाली. क्रेडाई महाराष्ट्रच्या सर्वसभासदांनी एकमताने शांतीलाल कटारिया यांची २ वर्षाच्या कालावधीसाठी निवड केली.शांतीलाल कटारिया हे ‘क्रेडाई- नॅशनल’ या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेचे कार्यकारी समिती सदस्य असून पर्यावरण समितीचे अध्यक्ष तसेच क्रेडाई- पुणे मेट्रोचेही अध्यक्ष आहेत.
२०१७ -१९ या कालावधीसाठी क्रेडाई- महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष पदांच्याही निवडणुका सदरदिवशी झाल्या त्यात संघटनेची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांच्यासमवेत राजीव पारीख (कोल्हापुर), प्रमोद खैरनार पाटील (औरंगाबाद),महेश साधवानी (नागपूर),रसिक चौव्हाण (नवी मुंबई) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सुनील कोतवाल (नाशिक)यांची सचिव पदी व अनुज भंडारी (पुणे) यांची खजिनदारपदी नेमणूक करण्यात आली.
४१ शहर संघटनांच्या राज्यस्तरीय अध्यक्षपदाची जबाबदारी कार्यक्षमतेने सांभाळण्यासाठी कटारिया यांनी पुणे शहरातून राज्यस्तरीय सल्लागार समिती अध्यक्षपदी सुहास मर्चंट, आदित्य जावडेकर- (संयोजक युवा विभाग), दर्शना परमार-जैन (संयोजक महिला विभाग), आय. पी इनामदार (कायदा समिती), अश्विन त्रिमल (महसूल समिती), अखिल अगरवाल (रेरा समिती) व याव्यतिरिक्त इतर २४ सदस्यांचा महाराष्ट्रातून आपल्या कार्यकारी समितीमध्ये समावेश केला आहे. बांधकाम क्षेत्राला भेडसावणारे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आणि त्यातून मार्ग काढण्याचे काम अनेक वर्ष ही संस्था करीत आहे. या राज्यस्तरीयसंस्थेत दर दोन वर्षानी नवीन अध्यक्षाची निवड केली जाते.