काँग्रेसच्या सर्वच इच्छुकांनी सुरु केला एकत्रित प्रचार
पुणे-कसबा – सोमवार प्रभाग क्र १६ मधील काँग्रेस पक्षाच्या सर्वच इच्छुक उमेदवारांनी महापालिका निवडणुकीच्या आपल्या प्रचाराची सुरुवात कसबा गणपतीचे दर्शन करून केली . तिकीट कोणलाही मिळो , परंतु काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली . यावेळी प्रभागातील नायडू गणपती , उंटाडे मारुती आदीचे दर्शन इच्छुक उमेदवारांनी करून काँग्रेस पक्षाचे माहितीचे प्रचार पत्रक मतदारांना दिले .
स्थिरता , सुरक्षितता , सामाजिक ऐक्यासाठी व प्रभागाच्या सर्वागीण विकासासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेद्वारांस आपले बहुमत देउन विजयी करण्याचे आवाहन सर्व इच्छुक उमेदवारांनी यावेळी केले .