कॉंग्रेस ची अवहेलना नको -राष्ट्रवादी बाबत तक्रार
पुण्यातही आघाडीचा तिढा कायम
पुणे- महापालिका निवडणुकीसाठी आघाडी करण्यासाठीचा आणि जागा वाटपाचा प्रस्ताव काँग्रेसकडून पाठविण्यात आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या आघाडीबाबत नेहमीप्रमाणे आकडय़ांचा वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादीकडून स्वतासाठी ११० जागा आणि काँग्रेसला ५२ जागा असा प्रस्ताव असेल असे वाटत असताना ,राष्ट्रवादीकडून ४६ जागांचा प्रस्ताव आल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे . परिस्थितीचा फायदा घेऊन राष्ट्रीय पक्षाची अशी अवहेलना करणे बरोबर नाही असा सूर काँग्रेस मधून उमटत होता .या प्रस्तावांमुळेआघाडीतील जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्हीकाँग्रेसकडून यासंदर्भात येत्या दोन दिवसांमध्ये प्राथमिक स्तरावर चर्चाहोणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान याप्रकरणी कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी ‘माय मराठी ‘शी बोलताना आपली भावना व्यक्त केली आहे . पहा ते काय म्हणाले …