पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांचे छायचित्र हटवून त्यांच्या अपमान केला असून हिटलर प्रमाणे हा निर्णय घेतला आहे.या त्यांच्या कृत्याबदल मोदींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी पुणे काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.
राष्ट्रपती महात्मा गांधी यांचे खादी ग्रामउद्योगच्या दिनदर्शिकेवरील छायचित्र हटवून नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आल्या प्रकरणी पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयासमोर काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
या आंदोलनात रामभाऊ मोझे,महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, अभय छाजेड,उपमहापौर मुकारी अलगुडे , दीप्ती चवधरी,संगीता तिवारी,कमल व्यवहारे सदानंद शेट्टी , सुधीर जानज्योत ,सोनाली मारणे,विकास लांडगे , मुक्तार शेख,लक्ष्मी घोडके,शोभना पणीकर , राजा महाजन,नीता रजपूत ,राजू साठे,प्रकाश आरणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बागवे यावेळी म्हणाले कि , गांधीजींच्या विचाराने प्रवृत्त होऊन नेल्सन मंडेला आणि खान अब्दुल गफार खान अशा बड्या नेत्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारून, वांशिक भेदभाव आणि परकीय साम्राज्याच्या विरोधात लढा दिला . इंग्लंड मधील गोल बैठकीला जाताना धोतर परिधान करून गांधीजी केले होते, तर मोदी यांनी १० लाखांचा सूट घालून विदेश दौरा केला . मोदी आणि गांधी हि तुलना होऊ शकत नाही त्यांच्या विचारात मोठी दरी आहे . महात्मा गांधीची बरोबरी कोणी करू शकत नाही म्हणून त्यांचे नाव आणि विचार संपविण्याचा प्रयत्न मोदी करीत आहेत यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.