दिलीप कांबळेंना अद्याप अटक का नाही ?
खरेपणा आणि हिंमत असेल तर सरकारने उत्तर द्या
पुणे-मंत्री पदाचा गैरवापर करून वाईन शॉप चा परवाना मिळवून देतो अशी बतावणी करून एक कोटी 92 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दिलीप कांबळे याचे वर औरंगाबाद सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर देखील त्यांच्यावर अटकेची कारवाई न करता त्यांना प्रतिष्ठा देण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे याचा निषेध आज पुणे शहर महिला काँग्रेस कमिटी कडून निदर्शनांद्वारे नोंदवण्यात आला.
उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्र्यांच्या समोर पुणे शहर महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष सोनाली मारणे यांच्या नेतृत्वाखाली आज जयहिंद चौक घोरपडी गांव येथे निदर्शनांचे आयोजन करण्यात आले.
भाजपा सरकार सत्तेचा पूर्णपणे गैरवापर करून भ्रष्टाचारामध्ये गुरफटलेल्या सर्वच भाजपेयी मंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची निंदाव्यजनक कृती मुख्यमंत्र्यांकडून होत आहे .या बाबीचा निषेध करुन दिलीप कांबळे यांच्या अटकेची आग्रही मागणी या निदर्शनात करण्यात आली.*
निदर्शनात सोनाली मारणे,शर्वरी गोतरणे, सुरेखा कवडे मीरा शिंदे,रजिया बल्लारी,लता घडसिग,अमिना शेख,संगीता क्षीरसागर, छाया जाधव,सुरेखा खंडागळे,मीरा दिघे, माया डूरे इत्यादींचा सहभाग होता..