पुणे- हेल्मेट सक्ती आम्ही आजवर जुमानली नाही आणि जुमानणार देखील नाही ,सविनय कायदेभंग करू असे सांगत पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांवर आपला वचक ,दहशत बसवावी , दुचाकीस्वार आणि सामान्य पुणेकरांवर दहशत बसविण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच्या बैठकीनंतर संदीप खर्डेकर यांनी केले आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पोलिसांना जशी आमच्या जीवाची काळजी आहे तशीच आम्हालाही पोलिसांच्या जिवाची काळजी आहे .. आम्ही त्यांचे हि फोटो काढू .. हेल्मेट विना फिरणारे, सीटबेल्ट न लावणारे … नियमभंग करणारे या सर्वांचे फोटो नागरिकांनी काढावेत आणि प्रसारित करावेत .या
हेल्मेट सक्ती मागे काही काळेबेरे संशय आपल्याला येतो असून
हेल्मेट मुळे मानेचा त्रास होतो याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले आहे .
आयुक्त आणि उपायुक्त अशा कृतीने पोलीस आणि नागरिकात दरी निर्माण करत आहेत असा आरोप हि त्यांनी केला ..पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे …