पुणे: कलर्स मराठीवर एक नवीन धमाकेदार डान्स रिअॅलिटी कार्यक्रम सुरु आहे 2 मॅड (MAD)- महाराष्ट्राचा अस्सल डान्सर! या निमित्ताने 2 मॅडचे परीक्षक महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना अमृता खानविलकर, सुप्रसिद्ध निर्माते–दिग्दर्शक संजय जाधव तसेच सगळ्यांचे लाडके आणि नृत्याबद्दल खास प्रेम असलेले नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव पुणेकरांच्या भेटीला आले होते. कावेरी इन्स्टिट्युट मध्ये 2मॅडच्या परीक्षकांकडून तरुणा
या कार्यक्रमावेळी कॉलेज मधील विद्यार्थ्यांची डान्स प्रतियोगिता घेण्यात आली. उत्कृष्ट स्टेप्स चे सादरीकरण त्यांच्याकडून करण्यात आले त्याने परीक्षक सुद्धा अचंबित झाले. या प्रतियोगितेमधील ४ विजेत्यांना कलर्स मराठी तर्फे विशेष बक्षिसे देण्यात आली. या प्रतियोगीतेमध्ये श्रेया इंगळहळीकर विजेती ठरली तर उपविजेता पिंटू यादव हा ठरला तर ऐश्वर्या माळी आणि अक्षया पाटील या स्पर्धकांनी अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान पटकावले.
या कार्यक्रमावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना अमृता खानविलकर म्हणाली कि, कोणत्याही कलेची आस आयुष्यात असणे खूप आवश्यक आहे. मला नृत्याबद्दल प्रचंड प्रेम आणि श्रद्धा आहे, आज माझी ओळख हि नृत्यामुळेच प्रभावी ठरली आहे. 2 मॅड या शो मध्ये असेच काही भन्नाट डान्सर आपल्या सर्वांना पाहायला मिळतील कि जे डान्स बाबतीत प्रचंड मॅड आहेत.
या प्रसंगी सुप्रसिद्ध निर्माते–दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले कि, 2 मॅड या रिअॅलिटी शो मध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या तुफान डान्सरचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. मी खूपच उत्सुक आहे
या रिअॅलिटी शो चे तिसरे परीक्षक सगळ्यांचे लाडके आणि नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव म्हणाले कि, 2 मॅड या शो मध्ये असे काही डान्सर पाहायला मिळत आहेत कि ज्यांची आपण कोणी कधी कल्पनाही करू शकत नाही. महाराष्ट्रात एवढे मोठे टॅलेंट आहे कि चाळीसगाव सारख्या शहरामधील एक डान्सर कि ज्याने झिरो ग्रॅव्हिटी स्टेप्स केल्या कि ज्या पाहून मी अचंबितच झालो आणि खरंच हि खूप अभिमानाची गोष्ट आहे कि आपल्या महाराष्ट्रामध्ये हर एक गोष्टींचं टॅलेंट भरभरून आहे, एखाद्या कलेवर किती प्रेम असावं हे मी या 2 मॅड च्या शो मधून जाणलं.
मॅड च्या पहिल्या पर्वाच्या यशानंतर याच कार्यक्रमाचे धमाकेदार दुसरे पर्व 2 मॅड(MAD) – महाराष्ट्रा
2 मॅड – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर सोम – मंगळ रात्री ९:३० वा. फक्त कलर्स मराठीवर पहाता येणार आहे