पुण्यातील उत्तर भारतीयांचा गिरीश बापट यांना पाठिंबा
पुणे : “नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वसमावेशक विकास होत आहे.अशा कृतिशील नेत्याच्या पाठीशी आणि पक्षाशी आम्ही उभे राहत आहोत,” असे सांगत उत्तर भारतीय सभा, पुणे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला.
यावेळी उत्तर भारतीय सभेचे रवी स्वामिनाथ तिवारी, अशोककुमार मिश्रा,मनोज टी. मिश्रा, त्रिभुवननाथ पांडे, अवधेश शुक्ला, सुभाष दुबे, प्रभूनारायण तिवारी, सिंह,अभय सिंह, उमेश यादव, सुरेंद्र यादव,विजय प्रताप पांडे, अशोक दुबे, रंगनाथ पांडे, विवेक मिश्रा, मनोज दुबे, मनोज मिश्रा,संजय मोर्या, अरविंद मोर्या, मंजू पांडे, राजेंद्र दुबे, प्रमोद दुबे, पवन पांडे, संतोष विश्वकर्मा, भरत सिंह, बालकृष्ण ओझा, विश्वनाथ विश्वकर्मा, गिरिजेश गिरी, रामविजय पांडे लक्ष्मीनारायण पांडे, विंध्याचल सिंह, कालीप्रसाद मिश्रा, प्रभाकर शुक्ला, बी. जी तिवारी,अजित सिंह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली. ते खासदार झाल्यास शहराचा संपूर्ण कायापालट करतील, असा विश्वासही यावेळी रवी स्वामिनाथ तिवारी, अशोककुमार मिश्रा, अवधेश शुक्ला यांनी प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केला. तसेच पुणे-गोरखपूर, पुणे- लखनऊ, पुणे-वाराणसी या मार्गावरील रेल्वेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी लक्षात घेऊन या रेल्वेच्या फेऱ्या प्रतिदिन कराव्यात, अशी मागणी करणारे निवेदनही संस्थेने बापट यांना यावेळी सुपूर्त केले.