- पंतप्रधान मोदी व्हिडिओद्वारे साधणार कार्यकर्त्यांशी संवाद
- पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मै हूँ चौकीदार’ या कार्यक‘माद्वारे आज (३१ मार्च) रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यकर्त्यांशी व्हिडिओद्वारे संवाद साधणार आहेत. ‘शुभारंभ लॉन्स’ येथे हे प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. महायुतीचे उमेदवार गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि पदाधिकारी या कार्यक‘माला उपस्थित राहणार आहेत.
बापट यांनी साधला महायुतीच्या दहा हजार कार्यकर्त्यांशी संवाद-मोदी व्हिडिओद्वारे साधणार कार्यकर्त्यांशी संवाद
पुणे- भाजप, सेना, आरपीआय, रासप व शिवसंग‘ाम महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्ता व पदाधिकार्यांच्या मेळाव्यांच्या माध्यमातून महायुतीच्या दहा हजार कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून कार्यकर्त्यांमध्ये जोष व उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, शिवसेनेचे रघुनाथ कुचीक, शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, रिपब्लीकन पार्टी ऑङ्ग इंडियाचे परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, शिवसंग‘ामचे भरत लगड, रासपचे सनी रायकर यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले.
काम करणारा कार्यकर्ता अशी महायुतीच्या कार्यकर्त्यांची ओळख आहे. गेल्या काही दिवसात शहरात महायुतीची ताकद वाढली आहे. महायुतीच्या विजय निश्चित आहे. परंतु कार्यकर्त्यांची गाङ्गील राहू नये. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना व विकास प्रकल्प सुरू केले आहेत. ही माहिती कार्यकर्त्यांनी मतदारापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी कामाचे नियोजन व नियोजनपप्रमाणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत श्री. बापट यांनी विविध मेळाव्यांमध्ये बोलताना व्यक्त केले. आहे.
निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निश्चित विजयी होणार आहे. परंतु कार्यकर्त्यांनी गाङ्गील राहू नये. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सूक्ष्म नियोजन करावे असे आवाहन खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले. गिरीश बापट तीन लाखांहून अधिक मतांनी निवडून येतील असा विश्वास खासदार काकडे यांनी व्यक्त केला. भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी गेले काही महिने पक्षाने विशेष प्रयत्न केले आहेत. या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा असे आवाहन श्री. गोगावले यांनी केले.
आमदार विजय काळे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकार्यांनी मेळाव्यांचे संयोजन केले.