मोदींसह दिग्गजांच्या सभा आणि प्रचारफेऱ्या पुण्यात – योगेश गोगावले
पुणे-उमेदवार कोणीही देवू द्यात आमची तयारी झाली आहे ,पंतप्रधान नरेंद्र मोदी ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच पंकजा मुंडे आणि नामवंतांच्या सभांसाठी ,दौऱ्यांसाठी आम्ही जय्यत तयारी करत आहोत . अजून तारखा ठरल्या नसल्या तरी आम्ही संपर्कात राहून पाठपुरावा करतो आहोत.पक्षाने उमेदवाराचे नाव घोषित करताच उमेदवारी अर्ज दाखल करू.२४ तारखेला कोल्हापुरातून प्रचाराचा नारळ फुटत आहे . या कार्यक्रमासाठी पुण्यातून नेते ,कार्यकर्ते जातील .अशी माहिती येथे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली .
ते म्हणाले ,पुणे लोकसभा मतदार संघात 6 विधानसभा मतदार संघ येतात ,या सहाही मतदार संघात मुख्यमंत्र्यांची सभा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील होईलचं त्याबरोबर पंकजा मुंडे ,गडकरी उयांच्या सभांचे नियोजन केले जाते आहे .पदयात्रा ,प्रचार फेऱ्या , यांचे नियोजन अखेरच्या टप्प्यात आहे. आम्ही प्रत्येक भागात पोहोचण्याचा प्रयत्न करू . बारामती मतदार संघात देखील आम्ही पुण्याचा काही भाग येतो येथे आम्ही वेगळे नियोजन करतो आहोत .सभांसाठी मैदाने आणि प्रचार फेऱ्यांसाठी कार्यकर्ते ,मार्ग याबाबत वारंवार माहिती घेतो आहोत .आम्ही लोकसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज आहोत असे ते म्हणाले .