पुणे- शिवसेनेशी युती व्हावी, ही भाजपची इच्छा आहे, शिवसेनेसोबत युतीबाबत चर्चा करण्यासाठी आमची तयारी आहे. युती झाली तर ठीकच अन्यथा आम्ही एकट्याने लढू असे स्पष्ट करत जिल्हास्तरावरील नेत्यांनी युतीसाठी चर्चा करावी असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.
पुण्यात भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. शिवसेनेसोबत युती करण्यास आम्ही तयार आहोत. पण ही युती सन्मानपूर्वक व्हावी. तसे नसेल तर स्वबळावर निवडणुका लढवल्या जातील. निवडणुकीनंतर भाजपच क्रमांक एकचा पक्ष असेल असे आत्मविश्वासपूर्वकपणे त्यांनी सांगितले. जिल्हास्तरावरील नेत्यांना याबाबत सूचना केल्या आहेत.मात्र त्यांनी प्रदेश समितीच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.