पुणे- केंद्रात सत्ता मिळाली , राज्यात ही सत्ता आहे … पुणे महापालिकेतही सत्ता मिळवायची आहे .. पण यासाठी वास्तू बदलली पाहिजे या दृष्टीने तर आज भाजप पुणे शहर कार्यालयाची वास्तू बदलण्यात आली नाही? असा प्रश्न आणि त्यावर खमंग चर्चा आज पुण्यात सुरु होती .नरेंद्र महाराजांच्या पायावर डोके ठेवणारे मुख्यमंत्री आणि एकंदरीत धर्मसत्तेला महत्व देणारे नेते भाजपात असल्याचा संदर्भ देऊनच ही चर्चा होत होती .
जंगली महाराज रस्त्यावरील भाजपच्या नवीन पुणे शहर कार्यालयाचे उद्घाटन आज सकाळी ११ वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे,आ. मेधा कुलकर्णी शहर अध्यक्ष योगेश गोगावले ,आ. भिमराव तापकीर आदी उपस्थित होते.
यापूर्वी भाजपचे पुणे शहर कार्यालय तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या बाजूच्या इमारतीमध्ये होते. मात्र आता हे कार्यालय निवडणुकांपर्यंत जंगली महाराज रोडवरील सन्मान हॉटेलच्या तळमजल्यावर असणार आहे.असे जाहीर करून
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आज सकाळी ११ वाजता करण्यात आले .
दरम्यान एकीकडे अशी चर्चा असली तरीही बुधवार पेठेतील
तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या रस्त्यावर पार्किंग ,गर्दी , अरुंद रस्ता आणि सोयीसुविधा यांचा प्रचंड अभाव होता.चारचाकीतून येणाऱ्या नेत्यांना या कार्यालयापर्यंत मोटारीने पोहोचणे अवघड होते . सन्मान हॉटेलच्या वर जरी नवे कार्यालय नेले असले तरी तिथे हि पार्किंग ची समस्या आहेच . पण नेत्यांना तिथे मोटारीने येणे जाणे सोयीचे होवू शकणार आहे .विशेष म्हणजे खासदार संजय काकडे यांच्या ऑफिस पासून हे पायी अंतरावर आहे . आणि वाहनतळाची देखील येथे सोय आहे . शेजारी संभाजी उद्यान देखील आहे . खासदार अनिल शिरोळे यांच्या निवासापासून देखील ते अवघ्या 6 मिनिटांच्या अंतरावर आहे .
महापौर उपमहापौर निवडणुका समयी कधी काळी याच परिसरात नगरसेवकांची बडदास्त ठेऊन त्यांना राजकीय नजरकैदेत आर्व सुखसुविधा मिळत .महापालिकेच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्याच्या बैठकांसाठी हे कार्यालय उपुक्त ठरणार आहे . जुन्या कार्यालयाने दीर्घ काळ भाजप सेवेत घालविली असली तरीही ते अत्यंत अपुरे अडचणीचे होवून बसले होते . आता सत्ता मिळवायची म्हटल्यावर कार्यालय बदल हा हवाच होता हे हि मान्य करावेच लागणार आहे .